मुस्लिम मुलीचे बोलणे ऐकून PM मोदी झाले भावूक

लोकल ते ग्लोबल
Updated May 12, 2022 | 17:00 IST

PM Modi gets emotional after hearing about his daughter's dream of becoming a doctor during Utkarsh Samaroh : गुजरातमधील भरुच येथे 'उत्कर्ष समारोह' पार पडला. याप्रसंगी अयूब पटेल यांच्या मुलीने पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधला. अयूब पटेल यांची मुलगी बोलत असताना पीएम मोदी भावूक झाले.

थोडं पण कामाचं
  • मुस्लिम मुलीचे बोलणे ऐकून PM मोदी झाले भावूक
  • गुजरातमधील भरुच येथे उत्कर्ष समारोहात घडली घटना
  • यूब पटेल यांची मुलगी बोलत असताना पीएम मोदी भावूक झाले

PM Modi gets emotional after hearing about his daughter's dream of becoming a doctor during Utkarsh Samaroh : नवी दिल्ली : गुजरातमधील भरुच येथे 'उत्कर्ष समारोह' पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. या प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या पीएम पदाच्या मे २०१४ ते मे २०२२ या आठ वर्षांच्या काळात सेवा, सुशासन, गरीब कल्याण यासाठी केलेल्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. सरकारच्या कल्याणकारी योजनांसाठी पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत सरकारी सेवांचा लाभ पोहोचावा यासाठी केंद्र सरकार काम करत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. याप्रसंगी अयूब पटेल यांच्या मुलीने पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधला. अयूब पटेल यांची मुलगी बोलत असताना पीएम मोदी भावूक झाले.

लाभार्थ्याने सांगितले अनुभव

अयूब पटेल हे सरकारी योजनांचे लाभार्थी आहेत. ते म्हणाले, मी नोकरीच्या निमित्ताने सौदीत होतो. तिथे असताना डोळे दुखतात म्हणून डोळ्यात औषध घातले. डोळ्यात चुकीचे औषधे घातल्यामुळे ग्लुकोमा झाला. आता संबंधित डोळा जेमतेम पाच टक्के कार्यक्षम आहे. त्यांच्या तिन्ही मुली सध्या शिकत आहेत. एक मुलगी बारावीत दुसरी आठवीत आणि तिसरी पहिलीत आहे. मोठ्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाचा खर्च सरकारी शिष्यवृत्ती योजनेतून सुरू आहे. तर पहिलीत असलेल्या मुलीला शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत शाळेत प्रवेश मिळाला आहे. आता आठवी पर्यंतच्या तिच्या शिक्षणाचा सगळा खर्च सरकारी निधीतून होणार आहे. अयूबने ही माहिती दिली. 

अयूब पटेलने सांगितले की, त्याची मोठी मुलगी वडिलांचा त्रास पाहून डॉक्टर होऊ इच्छिते. हे ऐकल्यावर पीएम मोदी यांनी अयूबच्या मोठ्या मुलीशी संवाद साधला. यावेळी अयूबच्या मोठ्या मुलीने डॉक्टर होण्याची इच्छा नव्याने जाहीर केली. वडिलांना झाला तसा त्रास इतर कोणाला होऊ नये अशी इच्छा असल्याचे सांगितले. अयूबच्या मुलीची इच्छा ऐकून पीएम मोदी भावूक झाले. मनापासून केलेली इच्छा हीच आपली ताकद असते. या इच्छेतूनच सामर्थ्य जागृत होते, असे पीएम मोदी म्हणाले. तुझे स्वप्न नक्की पूर्ण होईल, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी