Gandhi-Shastri Jayanti 2020: PM मोदींनी बापूंना आणि शास्त्रीजींना वाहिली श्रद्धांजली

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त आज संपूर्ण देश त्यांच्यापुढे नतमस्तक आहे. पीएम मोदी राजघाट आणि विजयघाट येथे पोहोचले आणि दोन्ही भाविकांना श्रद्धांजली वाहिली

pm modi pays tribute to mahatma gandhi
PM मोदींची गांधीजी आणि शास्त्रीजींना श्रद्धांजली 

थोडं पण कामाचं

  •  गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रपती, पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांनी बापूंना श्रद्धांजली वाहिली 
  • राजघाट येथे पोहोचल्यानंतर बापूंना पुष्पांजली वाहिली 
  • विजयघाट येथे पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी लाल बहादूर शास्त्री यांना श्रद्धांजली वाहिली

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त बापूंच्या स्मारक राजघाटला  पोहोचून त्यांना श्रद्धांजली वाहिली. बापूंच्या जयंतीनिमित्त ट्वीट करत पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘गांधी जयंतीनिमित्त आम्ही आमच्या प्रिय बापूंना नमन करतो. त्यांच्या आयुष्यातून आणि महान विचारांतून बरंच काही शिकायला मिळतं. समृद्ध आणि दयाळू भारत घडविण्यात बापूंचे आदर्श आपल्यासाठी मार्गदर्शन करत रहावे.’  या प्रसंगी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपितांना समर्पित आपल्या टिप्पण्यांचा एक छोटासा व्हिडिओ पोस्ट केला.


शास्त्रीजींना श्रद्धांजली

पंतप्रधान मोदींनी माजी माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली आणि ते म्हणाले की ते साधेपणाचे प्रतिक आहेत आणि त्यांनी आपले जीवन देशाच्या कल्याणासाठी अर्पिले. यावेळी त्यांनी शास्त्रीजींच्या स्मारकाला भेट दिली आणि त्यांना पुष्पांजली अर्पण केली. पीएम मोदी यांनी ट्विट केले की, 'लाल बहादूर शास्त्री जी एक नम्र आणि दृढनिश्चयी व्यक्ती होते. ते साधेपणाचे प्रतिक होते आणि देशाच्या हितासाठी जगले. आम्ही त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करतो आणि त्यांनी भारतासाठी जे काही केले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. '


राष्ट्रपतींनीही श्रद्धांजली वाहिली

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही गांधी जयंतीनिमित्त ट्वीट करून लिहिले आहे की, 'गांधी जयंतीनिमित्त मी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे संपूर्ण देशाकडून आभार मानतो व श्रध्दा-सुमन अर्पण करतो. त्यांचा सत्य, अहिंसा आणि प्रेमाचा संदेश समाजात समरसता आणि सुसंवाद साधून संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी मार्ग दाखवत राहील. ते सर्व मानवतेसाठी प्रेरणास्रोत बनले आहेत. चला, सर्वजण पुन्हा गांधी जयंतीच्या शुभ मुहूर्तावर वचन घेऊया की आम्ही सत्य आणि अहिंसेच्या मार्गाचं अनुसरण करू आणि स्वच्छ, समृद्ध, मजबूत आणि सशक्त भारत घडवू व देशाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी नेहमीच समर्पित राहू आणि निर्माण करु गांधीजींच्या स्वप्नातील भारत. 

लाल बहादूर शास्त्री यांना श्रद्धांजली अर्पण करताना राष्ट्रपती म्हणाले, “माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. भारत देशाच्या त्या महान पुत्राने अभूतपूर्व समर्पण व अखंडतेने देशाची सेवा केली. हरित क्रांती आणि श्वेत क्रांतीमधील मूलभूत भूमिकेसाठी आणि युद्धादरम्यान त्याच्या दृढ नेतृत्त्वासाठी सर्व देशवासीय त्यांचे भक्तिभावाने स्मरण करतात.”

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी