इथे पाहा PM मोदींचं संपूर्ण भाषण, फार महत्त्वाचं आहे हे भाषण 

PM Modi Speech LIVE VIDEO: पंतप्रधान मोदींनी आज देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी कोरोना व्हायरसबाबत सावधान राहण्याचं आवाहन जनतेला केलं आहे. 

pm modi
पाहा PM मोदींचं संपूर्ण भाषण, फार महत्त्वाचं आहे हे भाषण   |  फोटो सौजन्य: Twitter

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधानांनी केलेलं भाषण हे खूपच महत्त्वाचं आहे. कारण यावेळी मोदींनी देशातील कोरोना व्हायरसची स्थिती आणि जनतेचं नेमकं वागणं कसं आहे यावर भाष्य केलं आहे. यावेळी मोदी म्हणाले की, 'लॉकडाऊन संपलं असलं तरीही अद्याप व्हायरस गेलेला नाही. त्यामुळे आताच निष्काळजी होणं किंवा कोविड-१९ संपलं असू कुणीही मानू नये. अलिकडच्या काळात, आपल्याला अनेक फोटो किंवा व्हिडिओ पाहायला मिळत आहेत ज्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल की, बर्‍याच लोकांनी आता खबरदारी घेणे थांबवले आहे. हे बरोबर नाही.' असं पंतप्रधान मोदी म्हणाले.  

'जर आपण निष्काळजी असाल, मास्क न घालता घराबाहेर जात असाल तर आपण स्वत:ला, आपल्या कुटुंबाला, आपल्या कुटुंबातील मुलांना, वृद्धांना संकटात टाकत आहात. सध्या भारतात अनेक कोरोना लसीवक काम सुरु आहेत. यातील काही लस या प्रगतीपथावर आहेत. कोरोनाची लस जेव्हा येईल तेव्हा प्रत्येक भारतीयापर्यंत ती लवकरात लवकर कशी पोहचवावी याचीही सरकार तयारी करत आहे.' असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी