PM Modi speech: १० आठवड्यात सरकारनं देशहिताची पावलं उचलली: पंतप्रधान मोदी

भारत देश आज ७३ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. स्वातंत्र्य मिळून देशाला ७२ वर्ष पूर्ण झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं आहे. यावेळी कलम ३७० या मुद्द्यांवरही मोदींनी भाष्य केलं.

PM Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

 • आज ७३ वा स्वातंत्र्य दिन
 • पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सहाव्यांदा संबोधन
 • पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा
 • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर केलं ध्वजारोहण
 • ७३ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात उत्साह

नवी दिल्ली: भारत देश आज ७३ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. स्वातंत्र्य मिळून देशाला ७२ वर्ष पूर्ण झाली. या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहाव्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं आहे. यावेळी मोदींनी बऱ्याच मुद्द्यांवर भाष्य केलं. जवळपास मोदींनी दीड तास केलेल्या भाषणात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे, कलम ३७०. मोदींनी कलम ३७० आणि तिहेरी तलाकवर आपलं मत मांडलं. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर कशी परिस्थिती असेल हे देखील सांगितलं आहे. मोदींनी आपल्या भाषणाची सुरूवात देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन केली. त्यानंतर देशाच्या पूरपरिस्थितीवर दुःख व्यक्त करत मोदींनी पूरग्रस्तांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं म्हटलं. यात प्रमुख घोषणा म्हणजे मोदी, तिन्ही सुरक्षा दलप्रमुखांवर एक प्रभारी नेमणार असल्याची घोषणा मोदींनी केली आहे.

आपल्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात पंतप्रधान मोदींचं हे पहिलं भाषण केलं. अशातच मोदी आपल्या सरकारच्या पुढील धोरणं आणि दिशाबद्दल माहिती देखील दिली आहे. यासोबतचं जलसंचय अभियान सुरू करणार असल्याचं मोदींनी सांगितलं. तसंच वाढत्या लोकसंख्येवर मोदींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ५ वर्षांतली देशाच्या अर्थव्यवस्थेवही मोदींनी भाष्य केलं. आहे. दहशतवाद पसरवणाऱ्यांच्या विरोधात भारत उभा असं म्हणत पाकिस्तानचं नाव न घेता मोदींनी टीका केली आहे. या आणि अशा अनेक मुद्द्यांवर मोदींनी आपल्या भाषणात भाष्य केलं आहे.

पंतप्रधान मोदींच्या भाषणाचे लाइव्ह अपडेट्स:

 

 1. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण संपन्न
 2. जनतेनं डिजीटल पेमेंटला हा आणि नकदला ना असं म्हटलं पाहिजे- मोदी
 3. डिजिटल पेमेंटना जनतेनं प्राथमिकता द्यावी- मोदी
 4. रोखीनं व्यवहार करणं जनतेनं टाळायला हवं. स्थानिक उत्पादनांच्या खरेदीला जनतेनं प्राधान्य द्यावं
 5. देशातल्या पर्यटनस्थळांना प्रत्येकानं भेट द्यायला हवी.
 6. दुकानांमध्ये प्लास्टिक पिशवी न मागण्याचं पोस्टर लावावं- मोदी.
 7. प्लास्टिकमुक्ती अभियान सुरू करणं गरजेचं. मोदींकडून प्लास्टिकमुक्तीचं देशवासियांना आवाहन.
 8. मेड इन इंडिया वस्तू आपली प्राथमिकता व्हावी. प्लास्टिकमुक्ती अभियान सुरू करणं गरजेचं.
 9. तिन्ही सुरक्षा दलांमध्ये समन्वयासाठी नवं पद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाल किल्ल्यावरून घोषणा
 10. तिन्ही सुरक्षा दलप्रमुखांवर एक प्रभारी नेमणार- मोदी
 11. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पद नव्यानं निर्माण करणार
 12. बांग्लादेश, अफगाणिस्तान दहशतवादाविरोधात लढा देत आहेत-मोदी
 13. अतिरेक्यांना आश्रय देणाऱ्यांना, मदत करणाऱ्यांना शिक्षा होणार, शेजारील देशही दहशतवादाशी लढा देत आहेत. 
 14. दहशतवादाविरोधात देश कठोर लढा देत आहे- मोदी
 15. दहशतवादावर बोलताना मोदींनी  पाकिस्तानचं नाव घेणं टाळलं, शांती आणि सुरक्षा देशाच्या विकासासाठी अनिवार्य-मोदी
 16. लघु उद्योजकांची ताकद वाढवण्याची गरज, देशाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न गरजेचे. अत्याधुनिक सोयीसुविधांसोबत विकास पूर्ण करणं गरजेचं
 17. ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य पूर्ण करण्याचं ध्येय. स्थिर सरकार, स्थिर प्रशासन असेल तर जग विश्वास ठेवतं.
 18. मध्यम वर्गातील लोकांना स्वप्न पूर्तीसाठी सुविधा दिल्या पाहिजे, आधुनिक सुविधांसाठी १०० लाख कोटींची गरज
 19. ५ वर्षांतच आम्ही ३ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था केली, आता अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचं लक्ष्य- मोदी
 20. इज ऑफ डूईंगनंतर आता इज ऑफ लिव्हिंगचं लक्ष्य- मोदी
 21. ७० लक्षानंतर, २ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेपर्यंत पोहचलो, आधुनिक पायाभूत सुविधांसाठी १०० लाख कोटी आवश्यक
 22. लोकांच्या जीवनात सुधार व्हावे यासाठी प्रयत्न- मोदी
 23. गेल्या ५ वर्षांत रोज एक कायदा रद्द केला, जे कायदे कालबाह्य झाले त्यांना हद्दपार केलं.
 24. ना सरकार का दबाव हो, ना सरकार का अभाव हो- मोदी
 25. तंत्रज्ञानाचा वापर करून भ्रष्टाचार कमी करू, साथीदार म्हणून सरकार पाठीशी राहिलं पाहिजे.
 26. भ्रष्टाचार, घराणेशाहीनं देशाचं मोठं नुकसान, भ्रष्टाचार हटवण्यासाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्नांची गरज
 27. काही बड्या अधिकाऱ्यांना सरकारनं घरी बसवलं. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विरोधकांवर टीकास्त्र
 28. सुशिक्षित वर्ग लोकसंख्येचं महत्त्व जाणतो, छोटं कुटुंब ठेवून अनेकांनी देशहिताचा विचार केला. छोट्या कुटुंबामिळे विकासाला गती मिळाली. 
 29. छोटं कुटुंब हेदेखील देशभक्तीचं कार्य, वाढत्या लोकसंख्येवर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं बोट
 30. वाढती लोकसंख्या देशासमोर मोठं आव्हान- मोदी
 31. पाणी वाचवण्याचं अभियान सामान्यांचं अभियान व्हावं, आव्हानांना सामोरं जाऊन प्रश्न सोडवू
 32. आज पाणी विकत घेण्याची वेळ आली, न थकना है, न थमना है, न रूकना है- मोदी
 33. केंद्र, राज्य एकत्र घेऊन ३.५ लाख कोटी खर्च करू
 34. प्रत्येक घरात पिण्याचं शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न, जल जीवन मिशन घेऊन सरकार काम करणार - मोदी
 35. साडेतीन लाख कोटी रूपये जलजीवन मिशनसाठी, जल योजनेसाठी ३.५ लाख कोटींची तरतूद
 36. पाणी वाचवण्यासाठी सरकार अभियान चालवणार-मोदी
 37. जलसिंचन, जल संचय वाढवण्यावर भर- मोदी
 38. देशात एक देश, एक निवडणुकीची चर्चा
 39. एक देश, एक संविधान आज प्रत्यक्षात उतरलं- मोदी
 40. देशाच्या एकतेसाठी सरदार पटेलांनी प्रयत्न केले
 41. देशाला जोडण्याचं काम आज झालं, राजकारण नाही तर देशांचं भविष्य महत्त्वाचं
 42. सरदार वल्लभभाई पटेलांचं स्वप्न आज पूर्ण झालं- मोदी
 43. याआधीच्या सरकारनं दहशतवादाला, परिवारवादाला पोसलं
 44. काश्मीर, लडाखमधील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणं कर्तव्य
 45. आदिवासी, दलितांना काश्मीर खोऱ्यात राजकीय अधिकार
 46. कलम ३७० हटवल्यानंतर मात्र सर्वांना अधिकार मिळाले
 47. कलम ३७० चं समर्थन करणाऱ्यांवर मोदींचा निशाणा
 48. भ्रष्टाचार बोकाळला, महिला, दलितांवर अन्याय झाला- मोदी
 49. गेल्या ७० वर्षांत दहशतवाद, फुटीरतावादाला बळ मिळालं- मोदी
 50. आदिवासी, दलितांना काश्मीर खोऱ्यात राजकीय अधिकार
 51. काश्मीरच्या प्रश्नावरून मोदींचा विरोधकांना जोरदार टोला
 52. केंद्र सरकारनं पुढाकार घेऊन ३७० कलम हटवलं
 53. ७० वर्षांत जे झालं नाही ते सरकारनं ७० दिवसांत केलं, ३७० च्या मुद्द्यावरून मोदींचा काँग्रेसवर जोरदार निशाणा
 54. आम्ही प्रश्नांना मुळापासून सोडवण्याचा प्रयत्न करतोय
 55. कलम ३७० आणि ३५ ए हटवलं- मोदी
 56. १० आठवड्यात ३७० कलम हटवलं- मोदी
 57. लोकांनी दिलेलं काम पूर्ण करण्यासाठी सत्तेत
 58. शेतकऱ्यांच्या पेन्शनसाठी ६० हजार कोटींची तरतूद
 59. गेल्या ५ वर्षांत सर्वांचा विश्वास मिळवता आला- मोदी
 60. ५ वर्षांत कठोर परिश्रम करून लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या
 61. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील
 62. २०१९ मोदी नाही तर संपूर्ण देश निवडणूक लढत होता
 63. स्वप्न आणि संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीनं वाटचाल 
 64. निराशेचं रूपातंर आता आशेत करण्यात यश मिळालं
 65. मुस्लिम महिलांना तीन तलाकमुळे मुक्ती मिळाली
 66. तीन तलाकच्या भीतीपासून मुस्लिम महिलांना वाचवलं
 67. तीन तलाक विधेयकामुळे मुस्लिम महिलांना न्याय मिळाला
 68. आता देशवासियांमध्ये निराशेचं मळभ दूर झालंय
 69. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण देणाऱ्यांना नमन- मोदी
 70. आगामी पाच वर्षांत जनतेची स्वप्न साकार करू
 71. आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी सरकार कटिबद्ध
 72. कलम ३७० हटवणं हे सरदार पटेलांचं स्वप्न साकार झालं
 73. ३७० आणि ३५ए कलम हटवल्यानं सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्वप्न पूर्ण झालं
 74. संपूर्ण समर्पण भावनेनं जनतेची सेवा करतेय
 75. देशाच्या अनेक भागात आज पूरपरिस्थिती- मोदी
 76. १० आठवड्यात सरकारनं देशहिताची पावलं उचलली
 77. देशाच्या सुरक्षेसाठी अनेकांनी प्राणाचं बलिदान दिलं- मोदी
 78. नागरिकांचं दुःख दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न
 79. पुरात मृत्यू झालेल्य कुटुंबियांच्या दुःखात सहभागी
 80. पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यास कटिबद्ध
 81. देशाता अनेक भागांना पुराचा फटका - नरेंद्र मोदी
 82. सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा - नरेंद्र मोदी
 83. पंतप्रधान मोदींचं सहाव्यांदा लाल किल्ल्यावर भाषण
 84. लाल किल्ल्यावर अमित शहा, राजनाथ सिंह उपस्थित
 85. पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावर केलं ध्वजारोहण
 86. पंतप्रधानांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांशी केलं हस्तांदोलन
 87. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर दाखल
 88. नरेंद्र मोदी ट्विटरवरून देशवासियांना दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा
 89. पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून करणार भाषण
 90. मोदींकडून महात्मा गांधी पुष्ण अर्पण
 91. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजघाटावर वाहिली आदरांजली
 92. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजघाटावर दाखल
 93. आज भारताचा ७३ वा स्वातंत्र्यदिन

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी