रुग्णवाहिकेसाठी PM मोदींनी थांबवला त्यांचा ताफा, पाहा व्हिडिओ

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 30, 2022 | 19:13 IST

पंतप्रधान मोदी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यांनी वंदे भारत ट्रेन आणि अहमदाबाद मेट्रोचे उद्घाटन केले.  यादरम्यान मोदींनी रुग्णवाहिकेसाठी आपला ताफा थांबवला.

नवी दिल्ली :  पंतप्रधान मोदी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यांनी वंदे भारत ट्रेन आणि अहमदाबाद मेट्रोचे उद्घाटन केले.  यादरम्यान पंतप्रधान अहमदाबादहून गुजरातकडे जात असताना त्यांच्या ताफ्यामागे एक रुग्णवाहिका असल्याचे दिसले.प्रोटोकॉल मोडून पीएम मोदींनी त्यांचा ताफा थांबवला आणि प्रथम रुग्णवाहिकेला रस्ता दिला.  दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या दिवशी गांधीनगरमध्ये स्वदेशी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे उद्घाटन केल्यानंतर अहमदाबादमध्ये गुजरातच्या पहिल्या मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.

अहमदाबादचा कार्यक्रम संपल्यानंतर पंतप्रधान मोदींचा ताफा गांधीनगरकडे रवाना झाला. वाटेत मागून एक रुग्णवाहिका येताना पाहून पंतप्रधानांचा ताफा थांबवण्यात आला आणि रुग्णवाहिका गेल्यानंतर मोदींचा ताफा पुढे गेला. ही घटना अगदी छोटीशी वाटत असली तरी देशाच्या पंतप्रधानांच्या ताफ्याला थांबवून सुरक्षा जवानांनी रुग्णवाहिकेला रस्ता देण्याचे अनोखे पाऊल आहे.   #TimesNowNavbharatOriginals

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी