'मन की बात': आज पुन्हा पंतप्रधान मोदींचा 'मन की बात' कार्यक्रम, कधी आणि कोठे पाहाल LIVE  

PM Modi Mann Ki Baat Live Timing Today: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा आपल्या 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमातून देशवासीयांसमोर आपलं म्हणणं मांडणार आहेत. 

pm modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • 'मन की बात' कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी देशासमोर मांडणार आपलं मत
  • पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
  • कोरोना आणि चीनच्या प्रश्नावर पंतप्रधान मोदी नेमकं काय बोलणार?

नवी दिल्ली:  Mann Ki Baat LIVE Streaming: देशात सध्या असणारं कोरोना संकट आणि चीनसमवेत सुरू असलेल्या एलएसीवरील तणाव या सगळ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Moddi) आज (२८ जून) सकाळी ११ वाजता आकाशवाणीवर देशवासियांना संबोधित करतील. पंतप्रधान मोदी हे आपल्या 'मन की बात' (Mann Ki Baat) या रेडिओ कार्यक्रमातून देशवासीयांसमोर आपले विचार मांडतील. पंतप्रधानांच्या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा ६६ वा भाग असेल. आकाशवाणीवरून 'मन की बात' कार्यक्रमाचे प्रसारण झाल्यानंतर नंतर हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्ये देखील प्रसारित केला जाईल. जो रात्री आठ वाजता पुन्हा ऐकता येणार आहे. 

येथे पाहता येणार LIVE

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. ते कोणत्या-कोणत्या विषयावर आपली मतं मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, हा कार्यक्रम आपण https://www.timesnowmarathi.com/ वर लाइव्ह पाहू आणि ऐकू शकता.   याशिवाय आपण पंतप्रधान मोदींच्या फेसबुक आणि ट्विटर पेजवर देखील लाइव्ह पाहू शकता. ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनच्या संपूर्ण नेटवर्कवर आणि ऑल इंडिया रेडिओ न्यूजच्या संकेतस्थळावर www.newsonair.com वरही हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल.

पंतप्रधान मोदींच्या संबोधनाकडे सर्वांचं लक्ष 

पंतप्रधान मोदींच्या आजच्या कार्यक्रमाकडे सर्वांच्या नजरा आहेत. वस्तूतः चीन आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे देशात चीनबाबत विरोध आणखी तीव्र झाला आहे. पंतप्रधान मोदींच्या या संबोधनामुळे लोकांना आशा आहे की, ते आपल्या कार्यक्रमात सीमेवरील नेमक्या परिस्थितीचा उल्लेख करू शकतात. या व्यतिरिक्त पंतप्रधान आपल्या भाषणात कोरोना व्हायरस संदर्भात सुरू असलेल्या तयारीचा उल्लेख करू शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी