पाकिस्तानमध्ये झळकली PM मोदींचे पोस्टर्स, स्वतंत्र सिंधुदेश’साठी मागितली मदत (Video)

पाकिस्तान सध्या अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करत आहे. याचदरम्यान आता बलुचिस्तानप्रमाणेच सिंध शहरातूनही स्वातंत्र्याची मागणी होताना दिसत आहे.

Pakistan flag
पाकिस्तानमध्ये झळकली पंतप्रधान मोदींची पोस्टर्स, स्वातंत्र्य आणि वेगळ्या ‘सिंधुदेश’साठी मागितली मदत  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • पाकिस्तानमध्ये दिसले मोदींसह जागतिक नेत्यांचे पोस्टर्स
  • पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून वेगळ्या देशाची मागणी, जागतिक नेत्यांकडून मागितले समर्थन
  • याआधी पीओके आणि बलुचिस्तानमधूनही झाली होती अशीच मागणी

सिंध (पाकिस्तान): पाकिस्तानमध्ये (Pakistan) बलुचिस्तान (Baluchistan), पाकव्याप्त काश्मीर (Pak occupied Kashmir) आणि सिंध प्रांतातून (Sindh province) स्वातंत्र्याची मागणी (demand of independence) जोर धरत आहे. रविवारी सिंधमध्ये आयोजित एका स्वातंत्र्य रॅलीदरम्यान (independence rally) आंदोलनकर्त्यांनी हातात पंतप्रधान मोदींसह (PM Modi) इतर जागतिक नेत्यांचे (global leaders) पोस्टर घेऊन विरोधप्रदर्शन केले. या आंदोलकांनी या जागतिक नेत्यांकडून स्वातंत्र्याची मागणी करत या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

जागतिक नेत्यांची पोस्टर घेऊन आंदोलन

या रॅलीत अलग सिंधुदेश म्हणजेच सिंधुस्तान बनवण्याच्या मागणीवरून नारे दिले गेले. आधुनिक सिंधी राष्ट्रवादाच्या संस्थापकांपैकी एक जीएम सैय्यद यांच्या 117व्या जयंतीनिमित्त या विशाल रॅलीचे आणि विरोधप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यात पाकिस्तानच्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या आणि हातात पंतप्रधान मोदींसह इतर जागतिक नेत्यांचे पोस्टर घेऊन या जागतिक नेत्यांकडून स्वातंत्र्याची मागणी करत या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली. या आंदोलकांनी पंतप्रधान मोदी, अमेरिकेचे निर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन आणि इतर जागतिक नेत्यांची पोस्टर उंचावली आणि सिंधुदेशाच्या स्वातंत्र्यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी केली.

पाकिस्तानचा बेकायदेशीर कब्जा

आंदोलकांचा दावा आहे की सिंधू नदी ही सिंधू खोऱ्याची संस्कृती आणि वैदिक धर्माचे घर आहे ज्यावर ब्रिटिश साम्राज्याने अवैधरित्या कब्जा केला आणि त्यांनीच 1947मध्ये पाकिस्तानच्या दुष्ट इस्लामी सरकारच्या हातात हा भाग सोपवला. सिंधमध्ये अनेक राष्ट्रवादी समूह आहेत जे एक स्वतंत्र सिधूराष्ट्र मागत आहेत. ते अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर हा मुद्दा सातत्याने लावून धरतात आणि पाकिस्तान इथली संसाधने हस्तगत करण्यासोबतच इथल्या मानवाधिकारांचेही उल्लंघन करत असल्याचा आरोप पाकिस्तानवर करतात.

अनेक दशकांपासून लोक भोगत आहेत त्रास

माध्यमांशी बोलताना या विरोधप्रदर्शनाचे आयोजक शफी मोहम्मद बुरफत म्हणाले, ‘या लोकांनी आमच्या इतिहासाचा, आमच्या संस्कृतीचा नाश केला, हनन केले. सिंधवर कब्जा करण्यात आला, मात्र तिथे राहणाऱ्या लोकांनी आपली वेगळी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख जपून ठेवली. पूर्व आणि पश्चिमेचे धर्म, दर्शन आणि संस्कृतीच्या या ऐतिहासिक विश्लेषणाने आमची मातृभूमी असलेल्या सिंधला मानवी इतिहासात एक वेगळे स्थान दिले आहे.’ सिंधचा हा भाग अनेकदा पाकिस्तानी लष्कराच्या क्रूरतेचा सामना करतो. इथे पाकिस्तानच्या विरोधात बोलणारे कुणीही एकतर गायब होते किंवा त्या व्यक्तीला मारून टाकले जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी