Har Ghar Tiranga : 'हर घर तिरंगा' मोहीम, PM मोदींचे ट्वीट

'Har Ghar Tiranga' campaign: भारताच्या स्वातंत्र्य दिनाला यंदाच्या १५ ऑगस्ट रोजी ७५ वर्ष पूर्ण होतील. या ऐतिहासिक घटनेला साजरे करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हर घर तिरंगा' ही मोहीम सुरू केली आहे.

PM Modi's tweet on Har Ghar Tiranga campaign sparks political controversy Congress attacks government
Har Ghar Tiranga : 'हर घर तिरंगा' मोहीम, PM मोदींचे ट्वीट  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Har Ghar Tiranga : 'हर घर तिरंगा' मोहीम, PM मोदींचे ट्वीट
  • १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपापल्या घरावर तिरंगा फडकवा, PM मोदींचे आवाहन
  • केंद्र सरकार नागरिकांना मूळ मुद्यांपासून दूर नेण्याचा प्रयत्न करत आहे : काँग्रेस

'Har Ghar Tiranga' campaign: भारताच्या स्वातंत्र्य दिनाला यंदाच्या १५ ऑगस्ट रोजी ७५ वर्ष पूर्ण होतील. या ऐतिहासिक घटनेला साजरे करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हर घर तिरंगा' ही मोहीम सुरू केली आहे. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली 'हर घर तिरंगा' ही मोहीम महोत्सवाचाच एक भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपापल्या घरावर तिरंगा फडकवा असे आवाहन केले आहे. देशातील किमान २० कोटी घरांमध्ये तिरंगा पोहोचविणे आणि त्या घरांमध्ये तिरंगा फडकविणे हे लक्ष्य डोळ्यांपुढे ठेवून भारतीय जनता पार्टी काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या संदर्भात शुक्रवार २२ जुलै २०२२ रोजी ट्वीट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटच्या माध्यमातून तिरंग्याशी संबंधित ऐतिहासिक माहिती पण दिली. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटवर काँग्रेस पक्ष नाराज दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट केली ऐतिहासिक माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून सांगितले की आज २२ जुलै आहे. या दिवसाचे देशाच्या इतिहासात महत्त्व आहे. कारण याच दिवशी भारताच्या संसदेने तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला. यानंतर आणखी एक ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरंगा हा देशाचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्याचा प्रस्ताव तयार करणाऱ्या समितीबाबतची ऐतिहासिक माहिती सांगणारी कागदपत्रे नागरिकांना शेअर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपापल्या घरावर तिरंगा फडकवा असे आवाहन केले.

काँग्रेसच्या जयराम रमेश यांचे ट्वीट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटला रिप्लाय म्हणून काँग्रेस पक्षाच्या जयराम रमेश यांनी ट्वीट केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वातंत्र्याच्या ५२ वर्षांनंतर पहिल्यांदा संघाच्या कार्यक्रमस्थळी पहिल्यांदा तिरंगा फडकविला होता. तिरंगा फडकविण्यास दीर्घ काळ घेणारे आज आता 'हर घर तिरंगा' ही मोहीम राबवत आहे. हा नाटकीपणा आहे; अशा स्वरुपाचे मतप्रदर्शन ट्वीटमधून जयराम रमेश यांनी केले.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला निवडणूक आयोगाची नोटीस

भारतापुढे रोजगार, महागाई असे प्रश्न असताना 'हर घर तिरंगा' ही मोहीम राबवून केंद्र सरकार नागरिकांना मूळ मुद्यांपासून दूर नेण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी