[VIDEO]: पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा होणार लिलाव

PM Narendra Modi's gifts to be auctioned: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या २७७२ भेटवस्तूंचा येत्या १४ सप्टेंबर रोजी लिलाव करण्यात येणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांनी माहिती दिलीय.

PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी 

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या २७७२ भेटवस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे. येत्या १४ सप्टेंबर रोजी या भेटवस्तूंचा ऑनलाईन लिलाव करण्यात येणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांनी सांगितले की, या भेटवस्तूंची किंमत २०० रुपयांपासून सुरू होत आहे आणि भेटवस्तूंचा सर्वाधिक रक्कम २.५ लाख रुपये इतकी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यापूर्वी मिळलेल्या जवळपास १८०० भेटवस्तूंचा काही दिवसांपूर्वीच लिलाव करण्यात आला होता. आता पुन्हा भेटवस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावातून मिळणारी रक्कम केंद्र सरकारतर्फे गंगेच्या स्वच्छतेसाठी असलेल्या 'नमामी गंगे' या मोहिमेच्या कामात वापरण्यात येणार आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...