मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी 'या' वेळेला देशाला संबोधित करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (८ ऑगस्ट २०१९) देशवासियांना संबोधित करणार आहेत. यावेळी पंतप्रधान नेमकं कुठल्याविषयावर भाष्य करतात याकडे आता संपूर्ण देशातील नागरिकांच्या नजरा लागलेल्या आहेत.

PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: IANS

थोडं पण कामाचं

  • पंतप्रधान देशवासियांना रात्री संबोधणार
  • रेडिओच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार
  • कलम ३७० रद्द केल्यानंतर प्रथमच नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार
  • यापूर्वी २७ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित केलं होतं

नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर आता आज (८ ऑगस्ट २०१९) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच भाष्य करणार आहेत. रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. रेडिओवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करणार आहेत. देशवासियांना संबोधित करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या संदर्भात भाष्य करणार असल्याचं बोललं जात आहे. 

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यामागे भारत सरकारची नेमकी भूमिका स्पष्ट करणार असल्याचं वृत्त समोर येत आहे. जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रथमच भाष्य करणार आहेत त्यामुळे मोदी नेमकं काय म्हणतात त्याकडे सर्व देशाचं लक्ष लागलेलं आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ मार्च रोजी देशाला संबोधित करत भाष्य केलं होतं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सॅटेलाईट विरोधी मिसाईल उपग्रह पाडण्याची क्षमता असण्याच्या संदर्भात घोषणा केली होती. भारताने पृथ्वीपासून साधारणत: ३०० किलोमीटर दूर असलेल्या उपग्रहाला पाडलं होतं. आंतराळ क्षेत्रात भारताने केलेल्या या मिशनला 'मिशन शक्ती' असं नाव देण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ मार्च रोजी देशवासियांना संबोधित करत या मिशनची माहिती दिली होती.

५ ऑगस्ट रोजी भारत सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि तो म्हणजे जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या संदर्भात. सर्वप्रथम गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० रद्द करण्याचा आणि जम्मू-काश्मीर विभाजनाचा प्रस्ताव राज्यसभेत मांडला. त्यानंतर या प्रस्तावावर राज्यसभेत चर्चा झाली आणि हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर ६ ऑगस्ट रोजी हा प्रस्ताव राज्यसभेतही मांडण्यात आला आणि तेथेही तो मंजूर करण्यात आला. त्यामुळे आता जम्मू-काश्मीर राज्याचं विभाजन करुन जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश करण्याचा निर्णय झाला आहे.

कलम ३७० रद्द केल्याने पाकिस्तान बिथरला

जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर त्याचा परिणाम शेजारच्या पाकिस्तानातही जाणवण्यास सुरूवात झाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रात मांडण्याचं म्हटलं आहे. तसेच भारतासोबतचे द्विपक्षीय व्यापारी संबंध तोडले आहेत आणि भारतीय उच्चायुक्तांना परत पाठवण्याचा निर्णयही घेतला आहे. भारताचा स्वातंत्र्य दिन हा काळा दिवस म्हणून घोषित करणार असल्याचंही पाकिस्तानने म्हटलं आहे. दिल्लीमधून आम्ही आमच्या राजदूतांना परत बोलावणार असल्याचंही पाकिस्तानने म्हटलं आहे. त्यामुळे आता पंतप्रधान यावर काही भाष्य करणार, कलम ३७० रद्द करण्यामागे सरकारची भूमिका मांडणार की आणखीन काही बोलणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी 'या' वेळेला देशाला संबोधित करणार Description: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (८ ऑगस्ट २०१९) देशवासियांना संबोधित करणार आहेत. यावेळी पंतप्रधान नेमकं कुठल्याविषयावर भाष्य करतात याकडे आता संपूर्ण देशातील नागरिकांच्या नजरा लागलेल्या आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच आणखी एक धक्का बसण्याची शक्यता 
राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच आणखी एक धक्का बसण्याची शक्यता 
INX Media case: काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक
INX Media case: काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक
पाकिस्तानला मोठा झटका देण्यासाठी मोदी सरकारने केला 'हा' सर्वात मोठा प्लान
पाकिस्तानला मोठा झटका देण्यासाठी मोदी सरकारने केला 'हा' सर्वात मोठा प्लान
जीएसटीने केला घोळ; पार्ले कंपनी दहा हजार कामगारांना काढून टाकणार
जीएसटीने केला घोळ; पार्ले कंपनी दहा हजार कामगारांना काढून टाकणार
Baramulla Encounter: कलम ३७० लागू झाल्यानंतर पहिल्यांदा दहशतवादी- लष्करात चकमक 
Baramulla Encounter: कलम ३७० लागू झाल्यानंतर पहिल्यांदा दहशतवादी- लष्करात चकमक 
P Chidambaram INX Media case: चिदंबरम यांच्या अडचणींमध्ये वाढ; सर्वोच्च न्यायलयाकडूनही अद्याप दिलासा नाही
P Chidambaram INX Media case: चिदंबरम यांच्या अडचणींमध्ये वाढ; सर्वोच्च न्यायलयाकडूनही अद्याप दिलासा नाही
काँग्रेस नेते चिदंबरम मुलामुळे गोत्यात? काय आहे, आयएनएक्स मीडिया केस?
काँग्रेस नेते चिदंबरम मुलामुळे गोत्यात? काय आहे, आयएनएक्स मीडिया केस?
INX Media case: चिदंबरम यांच्या घराबाहेर नोटीस, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता 
INX Media case: चिदंबरम यांच्या घराबाहेर नोटीस, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता