Narendra Modi No. 1 'द मॉर्निंग कंसल्ट'च्या रेटिंगमध्ये मोदी नंबर वन

PM Narendra Modi approval ratings remains highest among 13 world leaders, Watch Rashtravad अमेरिकेतील डेटा फर्म 'द मॉर्निंग कंसल्ट'च्या रेटिंगमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या स्थानावर आहेत.

PM Narendra Modi approval ratings remains highest among 13 world leaders
'द मॉर्निंग कंसल्ट'च्या रेटिंगमध्ये मोदी नंबर वन 
थोडं पण कामाचं
 • 'द मॉर्निंग कंसल्ट'च्या रेटिंगमध्ये मोदी नंबर वन
 • अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन 'द मॉर्निंग कंसल्ट'च्या रेटिंगमध्ये सहाव्या स्थानी
 • मेक्सिकोचे अध्यक्ष दुसऱ्या तर इटलीचे पंतप्रधान तिसऱ्या स्थानी

PM Narendra Modi approval ratings remains highest among 13 world leaders, Watch Rashtravad । वॉशिंग्टन: अमेरिकेतील डेटा फर्म 'द मॉर्निंग कंसल्ट'च्या रेटिंगमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या स्थानावर आहेत. 'द मॉर्निंग कंसल्ट'ने जगातील तेरा देशांतील पंतप्रधान अथवा अध्यक्षांच्या लोकप्रियतेचा तसेच त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी यांचा अभ्यास करुन रेटिंग निश्चित केले. या प्रक्रियेत पंतप्रधान मोदी पहिल्या स्थानी आहेत. 

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन 'द मॉर्निंग कंसल्ट'च्या रेटिंगमध्ये सहाव्या स्थानी आहेत. मेक्सिकोचे अध्यक्ष दुसऱ्या तर इटलीचे पंतप्रधान तिसऱ्या स्थानी आहेत. रेटिंग निश्चित करण्यासाठी १०० देशांमध्ये सर्व्हे करण्यात आला. किमान दीड कोटी नागरिकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ही प्रक्रिया पूर्ण करुन तेरा नेत्यांचे रेटिंग ठरवल्याचे 'द मॉर्निंग कंसल्ट'ने सांगितले.

भारतातील विरोधी पक्ष सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत असतो. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी तर मोदींची तुलना हिटलरशी केली. विरोधक मोदींच्या विरोधात बोलत असताना अमेरिकेतील डेटा फर्म 'द मॉर्निंग कंसल्ट'च्या रेटिंगमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या स्थानावर आहेत.

'द मॉर्निंग कंसल्ट'ने पंतप्रधान मोदी यांना दिलेला नंबर वन काँग्रेसला अमान्य आहे. काँग्रेसच्यावतीने बोलताना उदित राज म्हणाले की, रेटिंग ठरवून तयार केलेले (मॅन्युपलेटेड) आहे. तर काँग्रेसच्या पवन खेडा यांनी हे रेटिंग म्हणजे मोदींची प्रतिमा मोठी करण्याचा उद्योग आहे. खेडा यांनी 'द मॉर्निंग कंसल्ट'च्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले. याआधी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ट्वीट करुन मोदींची तुलना हिटलरशी केली. 

अमेरिकेतील डेटा फर्म 'द मॉर्निंग कंसल्ट' २०१४ पासून कार्यरत आहे. ही एक पॉलिटिकल इंटेलिजन्स एजन्सी आहे. नेत्यांचे रेटिंग निश्चित करण्याचे काम ही संस्था करते. नेतृत्वक्षमता, अर्थव्यवस्था, ठिकठिकाणी केलेले सर्व्हे असे विविध निकष वापरुन नेत्यांचे रेटिंग निश्चित करण्याचे काम 'द मॉर्निंग कंसल्ट' करते.

 1. नरेंद्र मोदी, पंतप्रधान, भारत - ७० टक्के अप्रुव्हल रेटिंग
 2. लोपेझ ओब्राडोर, अध्यक्ष, मेक्सिको - ६६ टक्के अप्रुव्हल रेटिंग
 3. मारियो द्राघी, पंतप्रधान, इटली - ५८ टक्के अप्रुव्हल रेटिंग
 4. अँजेला मर्केल, चॅन्सलर, जर्मनी - ५४ टक्के अप्रुव्हल रेटिंग
 5. स्कॉट मॉरिसन, पंतप्रधान, ऑस्ट्रेलिया - ४७ टक्के अप्रुव्हल रेटिंग
 6. जो बायडेन, अध्यक्ष, अमेरिका - ४४ टक्के अप्रुव्हल रेटिंग
 7. जस्टिन ट्रूडो, पंतप्रधान, कॅनडा - ४३ टक्के अप्रुव्हल रेटिंग
 8. फुमिओ किशिदा, पंतप्रधान, जपान - ४२ टक्के अप्रुव्हल रेटिंग
 9. मून जे इन, अध्यक्ष, दक्षिण आफ्रिका - ४१ टक्के अप्रुव्हल रेटिंग
 10. बोरिस जॉनसन, पंतप्रधान, इंग्लंड - ४० टक्के अप्रुव्हल रेटिंग
 11. नपेड्रो सांचेज, पंतप्रधान, स्पेन - ३७ टक्के अप्रुव्हल रेटिंग
 12. इमॅन्युअल मॅक्रॉन, अध्यक्ष, फ्रान्स - ३६ टक्के अप्रुव्हल रेटिंग
 13. जेयर बोल्सनारो, अध्यक्ष, ब्राझिल - ३५ टक्के अप्रुव्हल रेटिंग

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी