पीएम मोदींनी शंकराप्रमाणे अनेक वर्षे विषपान केले : अमित शहा

PM Narendra Modi drank poison like Shiva for so many years, Amit Shah said on Gujarat riots : गुजरात दंगल प्रकरणी विशेष तपास पथकाने नरेंद्र मोदी यांना दिलेली क्लीन चीट ही सखोल तपासाअंती आणि निःपक्षपातीपणे दिल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले

PM Narendra Modi drank poison like Shiva for so many years, Amit Shah said on Gujarat riots
पीएम मोदींनी शंकराप्रमाणे अनेक वर्षे विषपान केले : अमित शहा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पीएम मोदींनी शंकराप्रमाणे अनेक वर्षे विषपान केले : अमित शहा
  • एसआयटीने नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट दिली
  • नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी गुजरात दंगल प्रकरणात निर्दोष

PM Narendra Modi drank poison like Shiva for so many years, Amit Shah said on Gujarat riots : गुजरात दंगल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने विशेष तपास पथक (स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम - एसआयटी) स्थापन करण्यात आले. या पथकाने तपास करून नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट दिली. पण हा विषय न्यायालयात पोहोचला. याचिकाकर्ता जाकिया जाफरी यांच्या याचिकेवर टिप्पणी करताना सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा मुद्दा मांडला. विशेष तपास पथकाने दिलेली क्लीन चीट ही सखोल तपासाअंती आणि निःपक्षपातीपणे दिल्याचे कोर्टाने सांगितले. काही जण मुद्दाम या विषयाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत होते; असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. या घडामोडींचा संदर्भ देत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले. 

नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी गुजरात दंगल प्रकरणात निर्दोष आहेत. मागील १८-१९ वर्षांपासून नरेंद्र मोदी भगवान शंकराप्रमाणे विषप्राशन करत होते. त्यांचा किती तरी वेळ अपमान झाला. चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न झाला. नरेंद्र मोदी यांनी हे सगळे सहन केले. मोदींनी कोणतीही चूक केली नव्हती पण त्यांना त्रास दिला जात होता. मीडियातील निवडक गट, ठराविक एनजीओ, विशिष्ट राजकीय गट यांनी वारंवार नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला; असे नरेंद्र मोदी म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी