PM Modi Speech | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ

Where To Watch PM Modi Address to Nation Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा देशवासियांना संबोधित करणार आहेत. आज सायंकाळी चार वाजता ते बोलणार आहेत. पाहा याचं लाइव्ह आपाण कुठे-कुठे पाहू शकता.

PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी अनलॉक २.० वर बोलत आहेत.
  • कोरोना बाबत लोक आता अजून बेफिकीर झाले आहेत.
  • देशातील ८० लाख जणांना तीन महिन्याचे रेशन दिले गेले.

नवी दिल्ली: देशातील सध्या सुरू असलेल्या कोरोना संकट आणि चीनच्या सीमेवरील तणावाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशातील जनतेसमोर आज (३० जून २०२०) दुपारी ४ वाजता संबोधित केले. यावेळी (PM Modi Address to Nation) पंतप्रधान मोदी यांनी सोशल डिस्टिसिंग पाळण्याच्या सूचना केल्या, तसेच देशातील गरिबांना गेले तीन महिने अन्नधान्य दिल्याचा उल्लेख केला. देशात वन नेशन वन राशन कार्ड' लागू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.  याआधी देखील पंतप्रधान मोदींनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी देशाला संबोधित केले आहे, मात्र, या संबोधनात त्यांनी चीनबाबत बोलणे टाळले आहे. 

देशात १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत अनलॉक २ विषयीची घोषणा करण्यात आली आहे. यासंदर्भातील मार्गदर्शक सूचनाही जाहीर करण्यात आल्या आहेत. देशात कोरोना रुग्णांची संख्या आता ५ लाख ६५ हजारांच्या देखील पुढे गेली आहे. तसंच आता रुग्ण बरे होण्याचा वेग देखील वाढला आहे. 

दुसरीकडे सीमेवर भारत आणि चीनमधील तणाव कायम आहे. (India-China) १५ जून रोजी गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाले होते. तेव्हापासून संपूर्ण देशात चीनविषयी संताप व्यक्त केला जात आहे. याच दरम्यान, केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले असून देशातील सार्वभौमत्व, अखंडता आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या ५९ चिनी मोबाइल (Chinese apps) अ‍ॅप्सवर बंदी घातली असून त्यामध्ये ज्यामध्ये  टिकटॉक, शेअरइट आणि वीचॅट ​​या अ‍ॅप्सचा समावेश आहे

.

पंतप्रधान मोदींचं भाषण इथे पाहता येणार लाइव्ह: 

सर्वांचे लक्ष पंतप्रधान मोदींच्या भाषणाकडे असणार आहे की, ते कोणत्या विषयावर आपलं मत मांडतात. आपण पंतप्रधानांचं लाइव्ह भाषण https://www.timesnowmarathi.com/ पाहू आणि ऐकू शकता. याशिवाय तुम्ही पंतप्रधान मोदींच्या फेसबुक पेज आणि ट्विटर पेजवर LIVE पाहू शकता.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी