PM Modi मोदींची शुक्रवारी केदारनाथ यात्रा

PM Narendra Modi to visit Kedarnath on November 5 पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार ५ नोव्हेंबर २०२१ रोजी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर (बलिप्रतिपदा) केदारनाथ यात्रा करणार आहेत

PM Narendra Modi to visit Kedarnath on November 5
PM Modi मोदींची शुक्रवारी केदारनाथ यात्रा 
थोडं पण कामाचं
  • PM Modi मोदींची शुक्रवारी केदारनाथ यात्रा
  • नरेंद्र मोदी केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतील
  • केदारनाथमध्ये सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतील

PM Narendra Modi to visit Kedarnath on November 5 । नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार ५ नोव्हेंबर २०२१ रोजी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर (बलिप्रतिपदा) केदारनाथ यात्रा करणार आहेत. केदारनाथ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतील. नंतर केदारनाथमध्ये सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतील. 

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते केदारनाथमध्ये ४०० कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ होईल. यानंतर पंतप्रधान शंकराचार्य यांच्या समाधीचे लोकार्पण करतील आणि शंकराचार्यांच्या मूर्तीचे दर्शन घेतील. उत्तराखंडमध्ये २०१३ मध्ये आलेल्या पुरात शंकराचार्यांच्या समाधीचे नुकसान झाले होते.

पंतप्रधानांच्या यात्रेच्यावेळी केदारनाथमध्ये अनेक संत-महंत उपस्थित असतील. केदारपुरी येथे सुरू असलेल्या अनेक विकासकामांचा पहिला टप्पा पूर्ण होऊन दुसरा टप्पा सुरू झाला आहे किंवा सुरू होणार आहे. या विकासकामांच्या प्रगतीचा आढावा पंतप्रधान केदारनाथ यात्रेच्या निमित्ताने घेतील.

उत्तराखंडमध्ये पुढच्या वर्षी (२०२२) विधानसभेची निवडणूक होणार आहे. यामुळे राज्यातील विकासकामांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी