[VIDEO]: पोलिसांकडून आरोपीला हॉकी स्टीकने मारहाण

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 12, 2019 | 22:17 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Viral VIDEO: पोलिसांकडून एका आरोपीला थर्ड डिग्रीच्या नावाखाली बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत आरोपीला मारहाण करत असताना हॉकी स्टीक तुटल्याचं व्हिडिओत दिसत आहे.

police beaten accused with hockey stick
[VIDEO]: पोलिसांकडून आरोपीला हॉकी स्टीकने मारहाण  

बंगळुरू: कर्नाटक पोलिसांचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पोलीस कर्मचारी एका आरोपीला हॉकी स्टीकने मारहाण करताना दिसत आहे. तसेच मारहाण करताना हॉकी स्टीक तुटल्याचंही व्हिडिओत दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीवर दरोडा आणि लुटण्याचा आरोप होता. पोलिसांनी या आरोपीला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलवलं आणि त्यानंतर त्याला बेदम मारहाण केलं.

पोलिसांकडून आरोपीला बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत तीन पोलीस कर्मचारी दिसत आहेत त्यापैकी दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला पकडलं आहे तर तिसरा पोलीस कर्मचारी हॉकी स्टीकने आरोपीला मारहाण करताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बंगळुरू पोलीस आयुक्त भास्तर राव यांनी पोलीस उपायुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच एका पोलीस उपनिरीक्षकाला चौकशी पूर्ण होई पर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. आरोपीला पोलिसांनी दोरीने बांधलं असून त्याला बेदम मारहाण होत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. पोलिसांकडून होत असलेली माराहण इतकी बेदम होती की हॉकी स्टीकच तुटते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
[VIDEO]: पोलिसांकडून आरोपीला हॉकी स्टीकने मारहाण Description: Viral VIDEO: पोलिसांकडून एका आरोपीला थर्ड डिग्रीच्या नावाखाली बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत आरोपीला मारहाण करत असताना हॉकी स्टीक तुटल्याचं व्हिडिओत दिसत आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles