प्रशांत किशोर यांनी घेतली राहुल गांधींची भेट, शरद पवारांसोबत गेल्या महिन्यात झाल्या अनेक बैठका 

निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली आहे. यापूर्वी त्यांनी नुकत्याच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी अनेक भेटी घेतल्या होत्या.

Prashant Kishor met Rahul Gandhi and had several meetings with Sharad Pawar last month
प्रशांत किशोर यांनी घेतली राहुल गांधींची भेट  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • २०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी कॉंग्रेससाठी रणनीती आखली आहे
  • आता प्रशांत किशोर एका नव्या आणि मोठ्या भूमिकेत दिसू शकेल
  • गेल्या महिन्यात शरद पवारांशी 3 बॅक टू बॅक बैठका झाल्या आहेत. 

नवी दिल्ली : दिल्लीच्या राजकारणाच्या गल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. वास्तविक निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. दोघांची भेट राहुल गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झाली. ही बैठकीकडे  मोठ्या संदर्भाच्या दृष्टीने पाहिले जात आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालापासून प्रशांत किशोर एका वेगळ्या मार्गाने कार्यरत आहेत. गेल्या महिन्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत त्यांनी बर्‍याच बैठका घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत हे लक्षात येते की  भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सक्षम आणि कणखर विरोधी पक्ष निर्माण करण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावणार तर नाही ना हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

प्रशांत किशोर यांनी गेल्या महिन्यात शरद पवार यांच्यासमवेत तीन थेट बैठका घेतल्या. या भेटींबाबत प्रश्न उपस्थित होत होते की दोघांमध्ये काय शिजत आहे? पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसच्या (टीएमसी) विजयात महत्त्वाची भूमिका निभावणारे प्रशांत किशोर यांनी 11 जूनला शरद पवार यांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली. यानंतर 21 जून रोजी दिल्लीत दोघांमध्ये संवाद झाला होता, त्यानंतर 23 जूनला पुन्हा दोघांची भेट झाली.

आता राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर उत्तर प्रदेश निवडणुकीत पुन्हा एकदा ते कॉंग्रेससाठी रणनीती आखतील काय, असा प्रश्न पडला आहे. त्यांनी 2017 मध्ये काँग्रेसची रणनिती आखली होती.  परंतु, त्यावेळी यश मिळाले नाही. पण प्रशांत यांना पंजाबमध्ये यश आले आणि यावेळी ते पंजाब निवडणुकीत अमरिंदर सिंग यांच्यासमवेत कॉंग्रेससाठी काम करतील. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत चर्चा झाली आहे की 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी मोठे चित्र तयार करण्याबाबत चर्चा झाली आहे काय, हा प्रश्नही आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी