प्रशांत किशोर यांनी सोडली कॅप्टनची साथ, मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारपदाचा दिला राजीनामा

Prashant Kishor News: भारतीय राजकारणातले चाणक्य म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यता व्यक्त होत असतानाच पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार पद त्यांनी सोडले आहे.

Prashant Kishor
प्रशांत किशोर यांनी सोडली कॅप्टनची साथ, मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारपदाचा दिला राजीनामा  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • प्रशांत किशोर यांचा पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख सल्लागारपदाचा राजीनामा
  • सार्वजनिक आयुष्यात सक्रीय भूमिकेतून अस्थायी अवकाश घेत आहेत किशोर
  • प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या व्यक्त केल्या जात आहेत शक्यता

नई दिल्ली: पंजाबचे (Punjab) मुख्यमंत्री (Chief Minister) कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) यांचे प्रमुख सल्लागार (chief advisor) प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी आपल्या पदाचा (post) राजीनामा (resignation) दिला आहे. त्यांचा हा राजीनामा अशावेळी आला आहे, जेव्हा पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकांना (assembly elections) काहीच काळ बाकी आहे आणि किशोर काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. किशोर यांनी अमरिंदर सिंह यांना याबाबत एक पत्र (letter) लिहून म्हटले आहे की ते सक्रीय राजकारणातून (active politics) अस्थायी काळासाठी लांब राहणार आहेत, त्यामुळे ते राजीनामा देत आहेत.

जाणून घ्या काय म्हणाले प्रशांत किशोर

प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे की सार्वजनिक जीवनातून अस्थायी काळासाठी लांब राहण्याच्या आपल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ते राजीनामा देत आहेत. प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे, 'आपल्याला माहितीच आहे, सार्वजनिक आयुष्यात सक्रीय भूमिकेतून अस्थायीरित्या लांब राहण्याच्या माझ्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आपल्या प्रमुख सल्लागाराच्या रुपात जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी मी सक्षम नाही. मला अद्याप माझ्या भविष्यातल्या कार्याबाबत निर्णय घ्यायचा आहे, मी आपल्याला अनुरोध करतो की मला या जबाबदारीतून मुक्त करण्याची कृपा करावी.'

याच मार्च महिन्यात 1 रुपया मानधनावर झाली नियुक्ती

कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या राजनैतिक रणनीतीकारपदी प्रशांत किशोर यांची नेमणूक प्रति महिना 1 रुपये इतक्या सांकेतिक मानधनावर प्रमुख सल्लागार म्हणून करण्यात आली होती. मात्र या काळात त्यांना एका कॅबिनेट मंत्रीपदी असलेल्या माणसाला दिले जाणारे सुसज्ज सरकारी निवासस्थान, कँप कार्यालय, अधिकृत वाहन आणि आरोग्य सुविधा प्रदान करण्यात आल्या होत्या. त्यांच्या नियुक्तीची घोषणा खुद्द अमरिंदर सिंह यांनी सोशल मीडियावर केली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी