मेहुणीशी जवळीकतेला विरोध केल्याने ८ महिन्याच्या गर्भवती पत्नीची गोळी घालून हत्या

crime news । दिल्लीच्या निजामुद्दीन भागात एका व्यक्तीने त्याच्या 8 महिन्यांच्या गर्भवती पत्नीची गोळ्या घालून हत्या केली. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

pregnant wife shot dead by husband in nizamuddin area delhi
मेहुणीशी जवळीक, पत्नीवर झाडल्या गोळ्या  |  फोटो सौजन्य: Times Now

नवी दिल्ली :  हजरत निजामुद्दीन पोलिस स्टेशन परिसरात भरदिवसा एका महिलेची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तिच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या. ती  8 महिन्यांची गरोदर होती. नवऱ्यावर खुनाचा आरोप आहे. महिलेच्या बचावलेल्या आलेल्या शेजारच्या मुलालाही गोळ्या घालण्यात आल्या. आरोपी पती दोन अवैध पिस्तूल घेऊन आला होता.  पहिल्या पिस्तुलातून गोळी चालली नाही तर त्याने दुसरी पिस्तुल काढून पत्नीवर अनेक गोळ्या झाडल्या असा आरोप केला जात आहे. रस्त्यावर बसलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. फुटेजमध्ये पती बिनधास्तपणे पत्नीवर दोन पिस्तूल घेऊन एकापाठोपाठ एक गोळ्या झाडत असल्याचे दिसून येत आहे. गल्लीतील घराच्या खाली पत्नी खुर्चीवर बसली होती. हा गुन्हा घडवून आणल्यानंतर आरोपी थेट पोलिस ठाण्यात गेला. तेथे त्यांना अटक करण्यात आली. या घटनेत वापरलेली दोन्ही अवैध पिस्तूलही त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहेत. या हत्येमागील कारण मेव्हणीशी जवळीक असल्याचे सांगितले जात आहे. या अवैध संबंधाला बायकोचा विरोध होता, त्यामुळे भांडणही झाले.


या घटनेनंतर घटनास्थळीच राहिला आरोपी

दक्षिण पूर्व दिल्ली येथील आरोपी डीसीपी आरपी मीणा यांनी मृत महिलेचे नाव शाइना (29) असे सांगितले. तर आरोपी पतीचे नाव वसीम (वय 32) असे आहे. या घटनेत जखमी झालेल्या युवकाचे नाव शहादत असे सांगण्यात आले आहे.  सीसीटीव्ही कॅमेर्‍यावर घडलेली ही घटना मंगळवारी सकाळी 10:24 ते 10: 27 दरम्यान घडली. यावेळी पत्नीला ठार मारल्यानंतर आरोपी वसीम घटनास्थळावरच राहिला. सकाळी 10:42 वाजता पीसीआर कॉल आला, अशी माहिती डीसीपीने दिली. ज्यामध्ये निजामुद्दीन भागात गोळीबार झाल्याचे सांगण्यात आले. पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि घटनेतील दोन जखमींना रुग्णालयात नेण्यात आले असल्याचे समजले. तेथे पोहोचलेल्या पोलिसांना शाइना नावाच्या महिलेचा  मृत्यू झाल्याचे समजले. तर शहादतवर इलाज सुरू आहे. या प्रकरणाच्या चौकशीनंतर पोलिसांनी तिच्या पती वसीमला शायनाच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली.

बायको तुरूंगात होती, त्यामुळे मेहुणीशी वाढली जवळीक

डीसीपीने सांगितले की शाइनाला एनडीपीएस प्रकरणात तुरूंगात टाकले गेले होते. ती सुमारे 8 महिन्यांची गरोदर होती. नुकतेच 24 एप्रिल रोजी ती तुरुंगातून बाहेर आली. शाइना तुरूंगात गेल्यानंतर आरोपी पती वसीम हा शाइनाची बहीण रेहाना यांच्यात जवळीक वाढली.  या प्रकरणात रेहानाच्या भूमिकेबाबतही चौकशी केली जाईल. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर जेव्हा शाइनाला तिच्या बहिणीची आणि नवऱ्याच्या जवळीकतेची बातमी समजली तेव्हा शायनाने तिच्या पतीशी याबाबत बोलली आणि त्याला विरोध केला असे पोलिसांनी सांगितले. दोघांमध्ये वाद झाला. यानंतर, वसीमने मंगळवारी सकाळी पत्नीवर गोळ्या झाडल्या. डीसीपी म्हणाले की, यापूर्वी शाइनाचे तीन वेळा लग्न झाले होते. तिचा तिसरा नवरा शराफत शेखही तुरूंगात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी