लसीकरणाची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारची- मोदी

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 07, 2021 | 19:15 IST

पंतप्रधान मोदींनी आज देशाला संबोधित करत मोठी घोषणा केली आहे. देशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण ( covid vaccine free in india ) होणार आहे.

थोडं पण कामाचं

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 5 वाजता देशवासियांशी संवाद साधणार
 • लसींच्या तुटवड्याविषयी संवाद साधू शकतील.
 • अनेक राज्यातील अनलॉक प्रक्रिया चालू आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी आज देशाला संबोधित करत मोठी घोषणा केली आहे. देशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण ( covid vaccine free in india ) होणार आहे. केंद्र सरकारने राज्यांना दिलेली जबाबदारी आपल्याकडे ( covid vaccine free ) घेतली आहे, असे आपल्या भाषणात मोदी यांनी स्पष्ट केले. (Prime Minister Narendra Modi address the nation )

पाहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मुद्दे 

 1. कोरोनाच्या या लढाईत विजयी होईल. 
 2. लसीकरणासंदर्भात जनजागृती करण्यात यावी. 
 3. लसीसंदर्भात अफवा पसरविण्यात आला. 
 4. ८० कोटी नागरिकांना मोफत अन्न देण्यात येणार, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना दिवाळीपर्यंत लागू राहणार
 5. लसीकरणाची संपूर्ण जबाबदारी केंद्राची 
 6. राज्यांना केंद्राकडून मोफत लस मिळणार 
 7. ७५ टक्के लशी भारत सरकार विकत घेऊन मोफत देणार 
 8. लसीकरणासाठी राज्यांना पैसे खर्च करण्याची गरज नाही. 
 9. खासगी हॉस्पिटल निर्धारित रक्कमेपेक्षा १५० रुपयांपेक्षा अधिक सर्विस टॅक्स घेता येणार नाही. 
 10. देशातील २५ टक्के लस हे खासगी हॉस्पिटलला देण्यात येणार 
 11. सर्वांना भारत सरकार मोफत लस देणार 
 12. राज्यांच्या २५ टक्क्यांचे कामही केंद्र सरकार करणार आहे. 
 13. मे महिन्यात काही राज्य सरकारांनी मान्य केले की केंद्राची लसीकरणाची यंत्रणा योग्य होती. 
 14. यात काय अडचणी येतात हे राज्यांना समजले. 
 15. १ मेपासून २५ टक्के लसीकरणाचे काम राज्यांना देण्यात आले. 
 16. लसीकरणाचे काम केंद्राने सुरळीतपणे सुरू ठेवले होते. राज्याला लसीकरणाचे अधिकार देण्यात आले. 
 17. राज्यांना आरोग्य संदर्भात निर्णय घेण्याचे आधिकार दिला. राज्यांची मागणी पूर्ण केली. 
 18. फक्त केंद्र सरकार निर्णय का घेते असा प्रश्न विचारण्यात आले. 
 19. कोरोनाच्या लाटेपूर्वी फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण झाले नसते, तर काय झाले असते, याचा विचार करा 
 20. लस तयार करणाऱ्या कंपन्यांना हवे ते सहकार्य केले. 
 21. नेझल व्हॅक्सिन तयार झाली तर लसीकरणाचे काम वेगाने होईल. 
 22. आता नेझल व्हॅक्सीनवर काम सुरू आहे. 
 23. लहान मुलांसाठी २ लसींवर काम सुरू आहे. 
 24. देशात ७ कंपन्या लस निर्मितीचे काम सुरू आहे. 
 25. क्लिनिकल ट्रायलसाठी पैसा देण्यात आला. 
 26. लसी तयार करण्यासाठी कंपन्यांना हजारो कोटी रुपये देण्यात आले. 
 27. देशातले गरीब आणि लहान मुलांची सरकारला चिंता 
 28. स्वतःमध्ये विश्वास असेल तर काम सिद्ध होते. 
 29. देशातील २३ कोटी लोकांना लसीचा डोस दिला गेला आहे. 
 30. भारताने एका वर्षात दोन मेडइन इंडिया लसी तयार केल्या. 
 31. प्रभावी लसीकरणासाठी इंद्रधनुष्य योजना राबविली. 
 32. लसीकरणाची वेगही वाढवला. 
 33. भारतात लसीची निर्मिती झाली नसती तर काय झाले असते, याचा विचार न केलेला बरा
 34. देशातील लसीकरणासाठी ४० वर्ष लागली असतील 
 35. परदेशातून आवश्यक असलेल्या औषधांसाठी कोणतीही कसर सोडली नाही. 
 36. जगातील कुठेही गरज असलेल्या गोष्टी मागविण्यात आल्या. 
 37. यासाठी ऑक्सिजन रेल्वे चालली, विमानं चालली आणि जहाजे चालली. 
 38. मेडिकल ऑक्सिजनची मागणी अभूतपूर्व वाढली होती. 
 39. कोरोनासी अद्याप लढाई सुरू आहे. 
 40. कोरोनात जीव गमावलेल्या कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे. 
 41. कोरोनाच्या लढाईत आपण अनेकांना गमावलं आहे. 
 42. गेल्या १०० वर्षात आलेली सर्वात मोठी महामारी होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी