Terrorist attack alert:Punjab मध्ये दहशतवादी हल्ल्याचा इशारा; ISI रचतेय चंदीगड, मोहालीमध्ये हल्ल्याचा कट

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 21, 2022 | 12:36 IST

Terrorist Attack alert: पंजाबमध्ये (Punjab) दहशतवादी हल्ल्याचा (Terror attack) इशारा देण्यात आला आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था (Pakistani intelligence agency) आयएसआय चंदीगड आणि मोहालीमध्ये दहशत निर्माण करण्याचा कट रचत असल्याची माहिती मिळत आहे.

थोडं पण कामाचं
  • पंजाबमध्ये (Punjab) दहशतवादी हल्ल्याचा (Terror attack) इशारा देण्यात आला आहे.
  • गुप्तचर यंत्रणेच्या अलर्टनंतर पंजाब पोलीस आणि सुरक्षा दल सतर्क झाले आहेत.
  • काही नेत्यांना टार्गेट करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

चंदीगड: Terrorist Attack alert in Punjab: पंजाबमध्ये (Punjab) दहशतवादी हल्ल्याचा (Terror attack)  इशारा देण्यात आला आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था (Pakistani intelligence agency)  आयएसआय चंदीगड आणि मोहालीमध्ये दहशत निर्माण करण्याचा कट रचत असल्याची माहिती मिळत आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार, दहशतवादी चंदीगड, मोहालीमध्ये आपला प्लॅन पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि बस स्टँडला लक्ष्य करण्याची शक्यता आहे. यामध्ये काही नेत्यांना टार्गेट करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. 

गुप्तचर यंत्रणेच्या अलर्टनंतर पंजाब पोलीस आणि सुरक्षा दल सतर्क झाले आहेत. या अलर्टमुळे सरकार काही नेत्यांना अतिरिक्त सुरक्षाही देण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. 

अधिक वाचा-   मुंबई पोलिसांना 26 मेसेज पाठवणारा संशयित विरारमधून ताब्यात

काही दिवसांपूर्वी सापडली होती स्फोटके

काही दिवसांपूर्वी पंजाबमधील अमृतसरमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याच्या स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (SUV) खाली लपवून ठेवलेले स्फोटक पदार्थ सापडले होते. पोलिसांनी सांगितलं की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोटारसायकलवरील दोन अनोळखी व्यक्तींनी एसयूव्हीच्या खाली स्फोटक ठेवले आणि नंतर घटनास्थळावरून पळ काढला. बॉम्ब निकामी पथकासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी पोहोचला आणि स्फोटक पदार्थ निकामी करण्यात आली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी