RTO अधिकाऱ्याच्या घरी धाड; सापडलं मोठं घबाड, उत्पन्नापेक्षा ६५० पटीने आढळली संपत्ती

EOW raids on RTO officer: आरटीओ अधिकाऱ्याच्या घरावर ईओडब्ल्यूने छापेमारी केली आहे. या छापेमारीत मोठं घबाड हाती लागलं आहे.

Raid on RTO officer Santosh Pal 16 lakh rs cash and jewellery found in jabalpur watch video
RTO अधिकाऱ्याच्या घरी धाड; सापडलं मोठं घबाड, उत्पन्नापेक्षा ६५० पटीने आढळली संपत्ती  |  फोटो सौजन्य: ANI

Raids on RTO officer property: मध्यप्रदेशातील जबलपूर येथील आरटीओ अधिकारी संतोष पाल याच्या मालमत्तेवर ईओडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली आहे. या धाडीत मोठं घबाड आढळून आलं आहे. आरटीओ अधिकाऱ्याच्या संदर्भात मिळालेल्या माहितीच्या आधारे ईओडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. जबलपूर येथील मालमत्ता आणि फार्म हाऊसवर छापा टाकण्यात आला. या छापेमारीत त्याच्या आलिशान घरांचीही माहिती उघड झाली आहे. इतकेच नाही तर या अधिकाऱ्याने आपल्या उत्पन्नाच्या एकूण ६५० पटीने अधिक संपत्ती जमवली आहे.

Economic Offences Wing चे अधिकारी राजपूत यांनी सांगितले की, उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीच्या प्रकरणात तपास सुरू आहे. सुरुवातीच्या तपासात आलिशान घर, लग्झरी कार, जमीन, प्लॉटसह कोट्यवधींच्या संपत्तीची माहिती समोर आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी