रायपूर : सीआरपीएफच्या 211 व्या बटालियनच्या जवानांना घेऊन जाणारी ट्रेन रायपूरहून जम्मूला जाण्याची तयारी करत होती. या दरम्यान, इग्नाइटर सेट ट्रेनच्या एका बोगीतून दुसऱ्या बोगीमध्ये हलवला जात असताना स्फोट झाला. सीआरपीएफचे सहा जवान जखमी झाले. (Raipur Train Blast: 6 CRPF personnel injured in train blast at Raipur railway station)
रायपूर रेल्वे स्थानकावर ट्रेनचा स्फोट होऊन सीआरपीएफचे सहा जवान जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या एका कॉन्स्टेबलला नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित पाच जवानांना प्राथमिक उपचारानंतर जम्मूला पाठवण्यात आले. सैनिकांसह ट्रेन जम्मूसाठी रवाना झाली आहे. घटनेनंतर सीआरपीएफ आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
त्याचवेळी रायपूर पोलिसांचे म्हणणे आहे की, या स्फोटात सीआरपीएफचे चार जवान जखमी झाले आहेत. सीआरपीएफ आणि जीआरपीचे अधिकारी रेल्वे स्टेशनवर उपस्थित आहेत आणि स्फोट कसा झाला हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. नारायण हॉस्पिटलचे डॉक्टर सांगतात की जवानाच्या डोक्याला आणि पायाला जखमा झाल्या आहेत. डॉक्टरांनी जवान सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. दारूगोळा हलवताना खूप काळजी घेतली जाते. इग्नाइटर सेट बोगी क्रमांक 9 वरून 8 मध्ये का हलवला जात होता याची अधिकारी चौकशी करत आहेत.