विकासासाठी नाही पैसा, खरेदी करतायत २०० करोडचं विमान; गहलोत सरकारचा पराक्रम

लोकल ते ग्लोबल
Updated Dec 04, 2019 | 17:26 IST | टाइम्स नाऊ हिंदी

अशोक गहलोत सरकार आता चक्क २०० करोड रूपयांचे एक मध्यम साईझ जेट विमान खरेदी करण्याची तयारी करत आहे. राजस्थान सरकारकडे आधीपासून दोन विमानं आहेत ती म्हणजे King air C-90 आणि C-200.

Rajasthan Government will buy Jet worth Rs. 200 Crore, but they don't have money to develop
विकासाला नाही पैसा, खरेदी करणार २००करोडचं विमान; गहलोत सरकार  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • अशोक गहलोत सरकार आता चक्क २०० करोड रूपयांचे एक मध्यम साईझ जेट विमान खरेदी करण्याची तयारी करत आहे.
  • राजस्थान सरकारकडे आधीपासून दोन विमानं आहेत ती म्हणजे King air C-90 आणि C-200.
  • नोव्हेंबरमध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी स्लो डाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था मागे पडत असल्याचे सांगितले होते.

जयपूर: राजस्थान सरकार त्यांच्या राज्याकडे विकासासाठी पैसा उरला नाही असा दावा करताना दिसत आहे, मात्र दुसरीकडे हेच अशोक गहलोत सरकार आता चक्क २०० करोड रूपयांचे एक मध्यम साईझ जेट विमान खरेदी करण्याची तयारी करत आहे. गहलोत सरकारने ऑक्टोबर महिन्यात एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागविले होते. त्याप्रमाणे २ डिसेंबरपर्यंत पाच आंतरराष्ट्रीय विमान निर्माता कंपन्यांनी यामध्ये सहमती दर्शविली.  

राजस्थान सरकारकडे आधीपासून दोन विमानं आहेत ती म्हणजे King air C-90 आणि C-200. आता या सरकारला असे विमान हवे आहे जे एकावेळी ३० ते ४० पर्यटकांसह यात्रा करू शकतो. राजस्थान सरकारच्या या निर्णयामुळे विरोधी पक्ष परिणामी जनताही चांगलीच पेचात पडली आहे. शिवाय विरोधी पक्ष यामुळे गहलोत सरकारवर चांगलात हल्लाबोल करेल यात शंका नाही.

नोव्हेंबरमध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी स्लो डाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था मागे पडत असल्याचे सांगितले होते. त्यामागचं कारणही त्यांनी सांगितलं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चुकीच्या पद्धतीने जीएसटी लागू केल्याने त्याचा परिणामही आर्थिकरित्या चुकीचा झाला. त्यांनी राज्य आर्थिक संकटातून जात असल्याचं सांगत राजस्थानालाही मोठ्या प्रमाणावर याचा फटका बसल्याचे सांगितले. राजस्थानला यावर्षी ७ हजार करोड रूपये कमी प्राप्त झाले. मग एवढ्याशा बजेटमध्ये राज्याचा विकास कसा काय शक्य आहे.

आश्चर्याची बाब ही आहे की, असे विधान करण्याच्या एक दिवसआधी राज्य सरकारने महाराष्ट्रातील काही कॉंग्रेस आमदारांना तिथल्या बड्या रिसॉर्टमध्ये रूम बूक करूनदिले होते. या रूम्सचे एक दिवसाचे भाडे हे जवळपास १८ हजार ते २८ हजार रूपये एवढे होते. महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी सुरू असलेल्या हायवॉल्टेज ड्रामानंतर नेत्यांची पळवापळव होऊ नये यासाठी त्यांना बाहेर पाठविण्यात आले होते.

गहलोत सरकारच्या या पराक्रमानंतर कदाचित त्यांना काहीतरी आठवण करून द्यायची गरज असावी. अशोक गहलोत यांनी जेव्हा राजस्थानचे मुख्यमंत्रिपद स्विकारले तेव्हा त्यांनी सरकारवर ३ लाख करोड कर्ज असल्याचे सांगितले होते.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी