कतरिनाच्या गालासारखा रस्ता हवा, म्हणाले राजस्थान सरकारचे मंत्री

Rajendra Gudha asks engineer to make roads like katrina kaif's cheeks पंचायत राज या खात्याचे मंत्री म्हणून राजेंद्र गुढा यांनी कामकाज सुरू केले. मंत्री म्हणून काम सुरू केले आणि गुढा यांनी एक वक्तव्य केले. या वक्तव्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. कारण रस्त्याविषयी बोलताना मंत्रिमहोदयांची जीभ घसरली.

Rajendra Gudha asks engineer to make roads like katrina kaif's cheeks
कतरिनाच्या गालासारखा रस्ता हवा, म्हणाले राजस्थान सरकारचे मंत्री 
थोडं पण कामाचं
  • कतरिनाच्या गालासारखा रस्ता हवा, म्हणाले राजस्थान सरकारचे मंत्री
  • रस्त्याविषयी बोलताना मंत्रिमहोदयांची जीभ घसरली
  • वक्तव्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत

Rajendra Gudha asks engineer to make roads like katrina kaif's cheeks जयपूर: राजस्थानमध्ये नुकताच मंत्रिमंडळ विस्तार झाला. नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. पंचायत राज या खात्याचे मंत्री म्हणून राजेंद्र गुढा यांनी कामकाज सुरू केले. मंत्री म्हणून काम सुरू केले आणि गुढा यांनी एक वक्तव्य केले. या वक्तव्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. कारण रस्त्याविषयी बोलताना मंत्रिमहोदयांची जीभ घसरली. कतरिनाच्या गालासारखा रस्ता हवा, असे राजेंद्र गुढा म्हणाले. यावर मंत्र्याने महिलेचा अनादर केल्याचे मत विरोधक व्यक्त करत आहेत तर समर्थक मंत्रिमहोदयांनी गमतीच्या उद्देशाने असे वक्तव्य केल्याचे सांगत राजेंद्र गुढा यांचा बचाव करत आहेत.

राजेंद्र गुढा मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच स्वतःच्या मतदारसंघात एका सभेत बोलत होते. सभेत बोलताना मतदारसंघातील रस्ते निर्मितीच्या मुद्यावर त्यांनी बोलायला सुरुवात केली. मंचावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे चीफ इंजिनिअर बसले होते. मंत्रिमहोदयांनी चीफ इंजिनिअर यांच्याकडे बघून मतदारसंघात मला कतरिनाच्या गालासारखा रस्ता हवा, अशा स्वरुपाचे वक्तव्य केले. मंत्रिमहोदयांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी