Congress Presidential Election : काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून गेहलोत बाहेर, थरूर यांचे पारडे जड

Ashok Gehlot : राजस्थानमध्ये गेहलोत समर्थक आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी सुरू केली होती. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून गेहलोत यांनाच मुख्यमंत्रिपदी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून अशोक गेहलोत बाहेर पडले असून आता शशी थरूर यांचे पारडे जड झाले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेहलोत स्वतःहून अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर जाणार नाही, तर पक्षाच्या निर्णयाचा वाट पाहणार आहेत.

ashok gehlot
अशोक गेहलोत  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राजस्थानमध्ये गेहलोत समर्थक आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी सुरू केली होती.
  • पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून गेहलोत यांनाच मुख्यमंत्रिपदी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
  • त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून अशोक गेहलोत बाहेर पडले असून आता शशी थरूर यांचे पारडे जड झाले आहे.

Ashok Gehlot : नवी दिल्ली : राजस्थानमध्ये गेहलोत समर्थक आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी सुरू केली होती. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून गेहलोत यांनाच मुख्यमंत्रिपद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून अशोक गेहलोत बाहेर पडले असून आता शशी थरूर यांचे पारडे जड झाले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेहलोत स्वतःहून अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर जाणार नाही, तर पक्षाच्या निर्णयाचा वाट पाहणार आहेत. जयपूरहून काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे आणि अजय माकन आज दिल्लीत पोहोचतील आणि सोनिया गांधी यांची भेट घेऊन पुढील चर्चा करतील. (rajsthan cm ashok gehlot will not contest election of congress president)

अधिक वाचा :  Chhagan Bhujbal: शाळेत सरस्वती शारदेचा फोटो हवेत कशाला?, छगन भुजबळांचे वादग्रस्त विधान

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत आणखी काही नावे आहेत. त्यात मुकूल वासनिक, मल्लिकार्जून खरगे, दिग्विजिय सिंह आणि केसी वेणूगोपाल यांच्या नावाचा समावेश आहे. काल आमदारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पक्षाची चिंता वाढली आहे. आता अध्यक्षपदाच्या शर्यतीत शशी थरूर यांचेही नाव आहे. गेहलोत यांचे नाव मागे पडल्याने थरूर यांचे पारडे जड झाले आहे. 

अधिक वाचा :  Eknath Shinde:  शिंदे गटाचे एक पाऊल मागे, शिवाजी पार्कसाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार नाही

सोनिया गांधी घेणार निर्णय

अजय माकन म्हणाले की जयपूरमध्ये तीन आमदारांची भेट घेतल्यानंतर आम्ही दिल्लीत आलो आहोत. राजस्थानबाबतचा अहवाल आम्ही सोनिया गांधी यांना देणार आहोत असे माकन म्हणाले. हा अहवाल पाहिल्यानंतर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी निर्णय घेतील असेही माकन म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी