Ram Mandir 3D Design: अयोध्येतील भव्य राम मंदिर असं असणार, पाहा थ्रीडी डिजाइन

3D model of proposed Ram Mandir, Ayodhya: अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्यात येणार आहे. हे राम मंदिर नेमकं कसं असेल त्याचं थ्रीडी डिजाइन आता सर्वांच्या समोर आलं आहे. 

ram mandir 3d design
अयोध्येतील भव्य राम मंदिर असं असणार, पाहा थ्रीडी डिजाइन 

Ram Mandir 3D Design: अयोध्येत भव्य राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) बांधण्यात येणार आहे आणि या राम मंदिराच्या भूमीपूजनाचा (Ram Mandir Bhoomipujan) सोहळा ५ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते हा भूमीपूजनाचा सोहळा पार पडेल. हे भव्य राम मंदिर नेमकं कसं असेल याबाबत सर्वांच्याच मनात उत्सुकता लागलेली आहे. कारण राम मंदिराच्या आराखड्यात काही बदल करण्यात आले आहेत. या भव्य राम मंदिराचे थ्रीडी डिझाइन आता सर्वांच्या समोर आले आहे. मंदिर बांधकामाचे आर्किटेक्ट आशिष सोमपुरा (Ashish Sompura) यांनी या थ्रीडी डिझाइनची माहिती दिली आहे. टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत सोमपुरा यांनी थीडी मंदिराबाबतची सविस्तर माहिती दिली आहे.

आशिष सोमपुरा यांनी सांगितले की, राम मंदिर हे नागर शैलीत बांधले जाणार आहे. उत्तर भारतातील मंदिरे सामान्यत: नागर शैलीमध्ये बनविली गेली आहेत. मंदिरावर तीन घुमट बांधण्याची रचना होती मात्र, आता बांधकाम विस्तारामुळे मंदिरावर तीन ऐवजी पाच शिखर (घुमट) आणि एक कळस अशी रचना असेल. आशिष सोमपुरा यांनी राम मंदिराच्या थ्रीडी डिझाइनबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

मंदिर बांधकामास जवळपास साडेतीन वर्षे लागतील. एएनआय न्यूज एजन्सीनुसार, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राम मंदिराचं भूमीपूजन होणार आहे. हे भूमीपूजन झाल्यावर प्रत्यक्ष बांधकामाला सुरूवात होईल. एल अँड टी कंपनीची टीम मशीन आणि इतर बांधकाम साहित्यांसह बांधकामस्थळावर पोहोचली आहे. पाया आणि बांधकामाला लवकरच सुरूवात करण्यात येणार आहे.'

मंदिर रचनेत काही बदल

१९८८मध्ये सर्वप्रथम राम मंदिराचे डिझान करण्यात आले होते. त्यानंतर आता या राम मंदिराच्या डिझाइनमध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या डिझाइनुसार मंदिराची उंची १४१ फूटावरुन वाढवून १६१ फूट इतकी करण्यात आली आहे. नव्या डिझाइननुसार मंदिरात दोन नवे शिखर जोडले जाणार आहेत.  गाभारा तसेच अग्रभाग, सिंहद्वार, नृत्यमंडप, रंगमंडप यांच्या रचनेत बदल झालेला नाही. तर बदलांमुळे मंदिरावर तीन ऐवजी पाच शिखर (घुमट) आणि एक कळस अशी रचना असणार आहे.

५ ऑगस्ट रोजी भूमीपूजन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमीपूजन होणार आहे. ५ ऑगस्ट रोजी ३२ सेकंदांच्या मुहूर्तात पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिराच्या गाभाऱ्यासाठी पाच चांदीच्या विटांचे भूमीपूजन करणार आहेत. या विटांचे वजन ४० किलोग्रॅम इतके आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी