[VIDEO]: राम मंदिराबाबत अमित शहा यांनी केलं मोठं वक्तव्य 

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम जन्मभूमी- बाबरी मशीद वाद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. त्यानंतर राम मंदिर निर्मितीचा मार्ग मोकळा झाला. याच राम मंदिराबाबत गृहमंत्री अमित शहांचं मोठं वक्तव्य

ram mandir ayodhya union home minister amit shah ram temple construction deadline up arathi news
राम मंदिराबाबत अमित शहा यांनी केलं मोठं वक्तव्य   |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • अयोध्येतील राम मंदिर लवकरच बनणार
  • गृहमंत्री अमित शहा यांनी ठरवली डेडलाइन
  • झारखंडमधील सभेत अमित शहांनी म्हटलं, चार महिन्यात पूर्ण होणार मंदिर निर्मितीची सर्व प्रक्रिया

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर अयोध्येत राम मंदिर निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. याच राम मंदिराबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. येत्या चार महिन्यांत राम मंदिर निर्मितीची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या जातील असं वक्तव्य अमित शहा यांनी झारखंड येथील एका जाहीर सभेत केलं आहे. अमित शहा यांनी पुढे म्हटलं, राम मंदिराच्या निर्मितीचं काम लवकरच तुम्हाला दिसून येईल.

झारखंडमधील पाकुड येथे निवडणुकीच्या प्रचारसभेत अमित शहा यांनी म्हटलं, राम मंदिराचं प्रकरण गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसने प्रलंबित ठेवलं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेत्रृत्वातील सरकारची खास बाब अशी आहे की, आम्ही कोणतंही प्रकरण प्रलंबित ठेवू इच्छित नाही. या वादग्रस्त जागेचा निर्णय चर्चेतून निघावा असं आमचं मतं होतं. मात्र, जेव्हा चर्चा निष्फळ ठरली तेव्हा न्यायालयाने दररोज सुनावणीचा निर्णय घेतला आणि आता न्यायालयाने दिलेला निर्णय आपल्या सर्वांच्या समोर आहे.

सर्वोच्च न्यायलायने राम मंदिर निर्मितीसाठी परवानगी दिली आहे. यानंतर जमीयत उलेमा हिंद, ऑल इंडिया मुस्लिल पर्सनल लॉ बोर्ड आणि हिंदू महासभा यांच्याकडून न्यायालयात एक पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली. मात्र, या सर्व पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या. सर्वोच्च न्यायलयाने पुनर्विचार याचिका फेटाळ्याने राम मंदिर निर्मितीत येणाऱ्या अडचणी संपल्या आहेत. 

९ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मभूमी- बाबरी मशीद वाद प्रकरणावर ऐतिहासिक निर्णय दिला. या वादग्रस्त जागेवर मंदिर बांधण्यात यावे तर मशिदीसाठी ५ एकर जागा अयोध्येतच इतर ठिकाणी देण्यात यावी असं सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे अयोध्येत राम मंदिर निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...