नवी दिल्ली : केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) भाषणास उभे राहीले आहेत आणि त्यांनी कविता म्हटली नाही असे होणे शक्यच नाही. आठवले यांचे कविताविरहीत भाषण म्हणजे आता कल्पनाही केली जात नाही. कार्यक्रम कोणताही असो तिथे आठवलेंची कविता ठरलेलीचं असते. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी राज्यसभेतही आज याचे दर्शन घडले. आठवलेंच्या कवितेमुळे सभागृहातील सदस्यांसोबत सभापती जगदीप धनकड यांनाही हसू आवरले नाही. (Ramdas Athawale Poem | Athawale's poem, and even the Rajya Sabha Speaker laughed)
आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मागील काही महिन्यात निधन झालेल्या खासदारांना श्रद्धांजली अर्पण केली गेली. तसेच या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे लक्ष सध्या गाजत असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर लागले आहे. अशात आठवलेंच्या कवितेमुळे सभागृहात हशा पिकला.