Sonali Phogat: बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि मर्डर? 180 अंशात फिरलीय सोनाली फोगाटच्या मृत्यूची थेअरी

Sonali Phogat News Today: भाजप नेत्या आणि सोशल मीडिया स्टार सोनाली फोगटच्या मृत्यूबाबत आता एक नवी चर्चा सुरु झाली आहे. कालपर्यंत सोनाली फोगाटचा गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे बोलले जात होते. पण आता तिच्या मृत्यूची थेअरी 180 अंशांत बदलली आहे.

rape blackmailing and murder sonali phogats death theory has taken a 180 degree turn
Sonali Phogat मृत्यू, बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि मर्डर?  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • सोनाली फोगटच्या मृत्यूची कहाणी! बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि मग हत्या?
  • भावाचा आरोप - सोनालीला तिच्या पीएनेच मारले
  • सोनालीच्या कुटुंबीयांची तक्रार धक्कादायक आहे

Sonali Phogat Death: मुंबई: भाजप (BJP) नेत्या आणि सोशल मीडिया स्टार सोनाली फोगाटच्या (Sonali Phogat) मृत्यूचे (Death) गूढ वाढत चालले आहे. कालपर्यंत सोनालीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे बोलले जात होते. मात्र आता ही मृत्यूची थेअरी 180 अंशांत बदलली गेली आहे. मृत्यूची थेअरी आता बलात्कार, (Rape) ब्लॅकमेलिंग (Blackmail) आणि खूनापर्यंत (Murder) पोहोचली आहे. सोनाली फोगटच्या भावाने पोलिसांत दाखल केलेली तक्रार अतिशय खळबळजनक आहे. सोनालीचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला नसून ती पूर्वनियोजित हत्या असल्याचे स्पष्ट तक्रारीत म्हटले आहे. हत्येचा आरोप अन्य कोणावर नसून सोनालीचा पीए सुधीर सांगवान याच्यावरच आहे. (rape blackmailing and murder sonali phogats death theory has taken a 180 degree turn)

केले जात आहेत 'हे' सवाल 

हे प्रश्न उपस्थित होत आहेत कारण सोनाली फोगटच्या भावाने जे काही आरोप केले आहेत ते अत्यंत खळबळजनक आहेत आणि हेच पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत देखील म्हटलं आहे. या खुलाशामुळे सोनालीच्या मृत्यूचे गूढ 180 अंशांत बदलून गेलं आहे. सोनालीचे पीए सुधीर सांगवान याच्यावर झालेल्या आरोपानंतर सीबीआय चौकशीची मागणी होत आहे. 22 ऑगस्टच्या रात्री सोनाली फोगाटने कुटुंबीयांना फोनवर जे सांगितले, त्यामुळे त्यांचा हत्येचा संशय अधिकच बळावला आहे.

अधिक वाचा: Sonali Phogat : टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचा गोव्यात मृत्यू, कारण आले समोर

भावाचा गंभीर आरोप

सोनालीचा भाऊ रिंकू ढाका याने गोव्यातील अंजुना पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत फोगाटच्या दोन साथीदारांनी गोव्यात तिची हत्या केल्याचा दावा केला आहे. रिंकू ढाकाने तिच्या बहिणीचा पीए सुधीर सांगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर यांच्यावर सोनालीला अंमली पदार्थ देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आणि व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. रिंकू म्हणाला की, कुटुंबीयांना दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) किंवा जयपूरमधील एम्समध्ये सोनालीचे पोस्टमॉर्टम करायचे आहे.

अधिक वाचा: Sonali phogat : टिकटॉक स्टार असलेल्या भाजप नेत्या सोनाली फोगाटचे खास किस्से, कोण होत्या फोगाट

सत्य बाहेर येईल का?

कालपर्यंत सोनालीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटका झाला किंवा तिने आत्महत्या केली असावी अशी एक थेअरी मांडली जात होती. मात्र आता हे प्रकरण बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि हत्या या भयंकर वळणावर येऊन पोहचलं आहे. सोनालीचा भाऊ, तिची बहीण, तिचे कुटुंबीय सोनालीचा मृत्यू नाही तर हत्या झालं असल्याचं वारंवार म्हणत आहेत. यामुळेच या घटनेमागचं नेमकं सत्य जाणून घेण्यासाठी ते सीबीआय चौकशीची मागणी करत आहे. आता प्रश्न असा आहे की, सरकार या प्रकरणाची सीबीआय चौकशी करेल का आणि सोनालीच्या मृत्यूचे सत्य बाहेर येईल का?

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी