भंगारवाल्याचा प्रामाणिकपणा, मालकाला परत केले भंगारात चुकून आलेले लाखोंचे दागिने

Ratlam Kabad man set an example of honesty, found jewelery and money of lakhs found in scrap and returned it to the owner : भंगारवाल्याचा प्रामाणिकपणा, मालकाला परत केले भंगारात चुकून आलेले लाखोंचे दागिने

Ratlam Kabad man set an example of honesty, found jewelery and money of lakhs found in scrap and returned it to the owner
भंगारवाल्याचा प्रामाणिकपणा, मालकाला परत केले भंगारात चुकून आलेले लाखोंचे दागिने  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भंगारवाल्याचा प्रामाणिकपणा, मालकाला परत केले भंगारात चुकून आलेले लाखोंचे दागिने
  • गरीब असूनही दागिने आणि पैशांच्या मोहाला बळी न पडता काले खां याने दागिने आणि पैसे मालकाला परत केले
  • काले खां याच्या प्रामाणिकपणाची चर्चा आसपाच्या अनेक गावांमध्ये सुरू

Ratlam Kabad man set an example of honesty, found jewelery and money of lakhs found in scrap and returned it to the owner : रतलाम : ही गोष्ट आहे मध्य प्रदेशमधील जावरातील काले खां नावाच्या व्यक्तीची. काले खां जावरातील मिनीपुरा आणि भोवतालच्या परिसरात भंगाराचा व्यवसाय करतो. अलिकडेच त्याला भंगारासोबत सुमारे तीन लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम आढळली. हे दागिने आणि पैसे काले खां ने प्रामाणिकपणे ज्याचे होते त्याला परत केले. 

जुन्या डब्यांमध्ये दागिने आणि पैसे अशा स्वरुपात सुमारे तीन लाखांची संपत्ती होती. भंगार देताना डब्यांमध्ये काही मौल्यवान वस्तू आहेत की नाही याची तपासणी झाली नव्हती. जुने डबे समजून मालकाने ते भंगारात काढले होते. भंगार घेताना काले खां याने जुन्या काळातील धातूच्या वस्तू असाच विचार केला आणि डबे न उघडता त्यांचे वजन केले. किलोच्या दराने भंगार घेऊन आणि पैसे देऊन काले खां याने व्यवहार पूर्ण केला होता. यानंतर आणखी काही ठिकाणी भंगाराचे सामान घेऊन मग काले खां परतला होता. 

धातुचा भंगार धातु वितळविणाऱ्याला द्यावा म्हणून काले खां भंगाराचे वर्गीकरण करत होता. ही प्रक्रिया सुरू असताना डब्यात काहीतरी वस्तू आहे असे वाटले म्हणून काले खां याने डबा उघडला. डब्यात दागिने आणि पैसे बघितल्यावर त्याला नेमका काय घोळ झाला हे लक्षात आले. यानंतर ज्या डब्यात दागिने आणि पैसे आढळले तो डबा कुठून घेतला हे आठवून काले खां मूळ मालकापर्यंत पोहोचला. त्याने दागिने आणि पैसे अशी सुमारे तीन लाखांची संपत्ती मालकाला परत केली. भंगाराच्या डब्यात तुमच्याकडचे दागिने आणि पैसे राहिले होते अशी माहिती मालकाला दिली. दागिने आणि पैसे मिळताच मालकाने भंगारवाल्याचे कौतुक केले. 

काले खां याने कृतीची माहिती दागिने आणि पैसे ज्याचे होते त्याच्याकडून कानोकानी पसरत जावराचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाण्डेय यांच्यापर्यंत पोहोचली. आमदार महोदयांनी काले खां याला बोलावून घेतले आणि त्याचे कौतुक केले. गरीब असूनही दागिने आणि पैशांच्या मोहाला बळी न पडता काले खां याने दागिने आणि पैसे मालकाला परत केले यासाठीच आमदार महोदयांनी त्याचे जाहीर कौतुक केले. 

काले खां याच्या प्रामाणिकपणाची चर्चा आसपाच्या अनेक गावांमध्ये सुरू आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी काले खां याची मुलाखत घेऊन त्याच्या प्रामाणिकपणे केलेल्या कृतीची माहिती जगापर्यंत पोहोचविली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी