बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली बंडखोरी याचे सांगितले कारण, ऑडिओ क्लिप व्हायरल

महाराष्ट्रातील सत्तानाट्याचा आता चौथा दिवस आहे. गुवाहाटीमध्ये गेलेल्या बंडखोर आमदारांनी आता कार्यकर्त्यांशी संपर्क करण्यास सुरुवात केली आहे. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांची एक ऑडीओ क्लिप व्हायरल होते. 

Rebel MLA Shahaji Bapu Patil  audio clip went viral
शहाजी बापू पाटील यांची ऑडिओ क्लिप व्हायरल  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांपैकी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा आणि त्यांचा कार्यकर्ता रफीक शेख यांच्यामधील फोनवरील संभाषण झाले ते आता व्हायरल होत आहे.  
  •  पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यासोबत मतदारसंघ, माजी दिवंगत आमदार गणपत पाटील यांचे संबंध, कार्यकर्ता म्हणून केलेला संघर्ष, एकनाथ शिंदे याचं नेतृत्त्व, देवेंद्र फडणवीस, अजित दादा  यांच्यासोबतचे संबध याविषयी भाष्य केलं आहे.
  • नवं सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील.

मुंबई : गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांपैकी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा आणि त्यांचा कार्यकर्ता रफीक शेख यांच्यामधील फोनवरील संभाषण झाले ते आता व्हायरल होत आहे.  पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यासोबत मतदारसंघ, माजी दिवंगत आमदार गणपत पाटील यांचे संबंध, कार्यकर्ता म्हणून केलेला संघर्ष, एकनाथ शिंदे याचं नेतृत्त्व, देवेंद्र फडणवीस, अजित दादा  यांच्यासोबतचे संबध याविषयी भाष्य केलं आहे.नवं सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील, आता सांगोला तालुक्याचा विकास होईल, असा विश्वास शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला. 

महाराष्ट्रातील सत्तानाट्याचा आज चौथा दिवस आहे. २० जूनच्या रात्रीपासून सुरु झालेला संघर्ष अद्याप सुरु आहे. एकनाथ शिंदे समर्थक आमदार अगोदर गुजरातमधील सूरतमध्ये गेले. पुढे शिंदे समर्थक आमदारांना गुवाहाटीला नेण्यात आले. 


शहाजीबापू पाटील आणि कार्यकर्ता यांच्यातील संभाषण 

कार्यकर्ता: हॅलो

शहाजीबापू पाटील: हॅलो

कार्यकर्ता: नेते नमस्कार

शहाजीबापू पाटील: नमस्कार नमस्कार

कार्यकर्ता: कुठाय नेते, तीन दिवस फोन लावतोय फोनच लागत नाही

शहाजीबापू पाटील : आम्ही सध्या गुवाहाटीमध्ये आहे

कार्यकर्ता: बर

शहाजीबापू पाटील : काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल ओकेमध्ये आहे.

कार्यकर्ता: इथं टीव्हीवरच आम्ही बघतोय, तुमचा कसलाच कॉन्टॅक्ट नाही ,एवढा सगळा घटनाक्रम जरा बोलयाचं, थोडं तरी सांगायचं

शहाजीबापू पाटील : नाही नाही हॅलो नेत्यांचा आदेश होता कुणाला फोन करु नका. आता ४१ झाल म्हणल्यावर मला बी करमना झालंय म्हणलं, मेलो तालुक्यात काय चाललंय, तालुक्यात कुणाला तरी बोलू म्हणलं, बर पहिलं सांगा तालुका कसा आहे.

कार्यकर्ता: इथ काय सगळं ओके आहे, तुम्ही घेतलेल्या भूमिकेचं स्वागत केलंय. बापूंना मंत्रिपद मिळतंय अशी सगळ्या तालुक्यात चर्चा आहे, सगळ्यांना तुमचा निर्णय आवडलाय.

शहाजीबापू पाटील: अरे वा रफिकभाई तुम्हाला बोललो नाही, माणसाचं नेतृत्त्व चांगलं आहे, वर्षभर नेतृत्त्व आवडलं होतं. आमच्या आमदारक्या आय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हाणतंय आणि आम्ही मोकळं राहतोय.

कार्यकर्ता: बर बर


शहाजीबापू पाटील :ही भावना प्रत्येकाची झालीय

कार्यकर्ता: :आलेत का सगळे, टीव्हीवर ४६ दाखवतंय

शहाजीबापू पाटील : शिवसेनेच्या जवळ ४१ झालेत दोघं तिघे वाटेवर आहेत ४५ होतील आणि अपक्ष ७ ते ८ होतील

कार्यकर्ता: कधी होणार हे सगळं

शहाजीबापू पाटील : सरकार झालं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे साहेब यांना उपमुख्यमंत्री, चांगली संख्या मंत्रिपदाची एकनाथ
शिंदे साहेबांच्या गटाला मिळणार,

कार्यकर्ता:बर बर

शहाजीबापू पाटील : देवेंद्र फडणवीस हे मला भावासारखे, एकनाथ शिंदे मला मुलासारखं बघतात. 

शहाजीबापू पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्याशी बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर आक्षेप घेतले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहिल्यास आपण संपून जाऊ, पुढील निवडणुकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी