road accident in madhya pradesh sidhi district 14 died 56 injured : मध्यप्रदेशमध्ये शुक्रवार 24 फेब्रुवारी 2023 रोजी संध्याकाळी मोहनिया बोगद्याजवळ ट्रकची धडक बसल्यामुळे 3 बस उलटल्या. या अपघातात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातामध्ये 56 जण जखमी झाले. उलटलेल्या बसमधील सर्व प्रवासी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी सतना येथे गेले होते. तिथून परतत असताना अपघात झाला.
मोहनिया बोगद्याजवळ सिमेंटने भरलेल्या ट्रकचा टायर फुटला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक जवळच असलेल्या एका बसला धडकला. या धडकेत त्या बसचा चुराडा झाला तसेच बस वेडीवाकडी होत पुढील वाहनांना धडकली. यामुळे चुराडा झालेली बस तसेच इतर 2 बस अशा 3 बस उलटल्या.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी अपघातात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच रात्री उशिरा त्यांनी घटनास्थळी जाऊन अपघातस्थळाची आणि परिस्थितीची पाहणी केली. अधिकाऱ्यांशी बोलून मदतकार्याचा आढावा घेतला.
Hydrogen Buses in India: भारतात चालणार हायड्रोजन बसेस, धुराऐवजी सोडणार पाणी
जखमींवर रीवा मेडिकल कॉलेज आणि जिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. सर्व जखमींना योग्य उपचार मिळतील याची खबरदारी घेण्याचा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही अपघाताचे वृत्त कळताच मृत्यू झालेल्यांविषयी दुःख व्यक्त केले. जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी देवाकडे प्रार्थना करत असल्याचे ट्वीट करून सांगितले.