Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत मशिदीत पोहोचले आणि इमामांची भेटही घेतली, VIDEO

Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी यांची भेट घेतली. 

RSSS chief Mohan Bhagwat reaches mosque in delhi held meeting with Imam watch video
Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत मशिदीत पोहोचले आणि इमामांची भेटही घेतली, VIDEO 
थोडं पण कामाचं
  • दिल्लीतील मशिदीला मोहन भागवत यांची भेट 
  • दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील मिशिदीत इमामांची घेतली भेट
  • मोहन भागवत यांच्यासोबत संघ प्रचारक इंद्रेश कुमार आणि हरीश कुमार होते उपस्थित

Mohan Bhagawat: संघप्रमुख मोहन भागवत यांनी आज दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील मशिदीचा दौरा केला. मशिदीत गेल्यावर मोहन भागवत यांनी अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख इमाम डॉ इमाम उमर अहमद इलियासी यांची भेट घेतली. या बैठकीत इमाम उमर अहमद इलियासी, संघ प्रचारक इंद्रेश कुमार आणि हरीश कुमार हे सुद्धा उपस्थित होते. (RSS chief Mohan Bhagwat reaches mosque in delhi held a meeting with Imam watch video)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यकर्त्याच्या मते, दिल्लीतील मशिदीत आयोजित केलेली बैठक समाजा्या या वर्गातील लोकांशी जोडण्याचा संघाचा एक प्रयत्न आहे. सूत्रांच्या मते, मुस्लिम समुदायाच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत संघ प्रमुखांनी भारताच्या प्रगतीसाठी विविध समुदाय आणि धर्मांमध्ये एकता कशी आवश्यक आहे हे अधोरेखित केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी