Samjhauta Express: पाकिस्तानकडून समझौता एक्स्प्रेस बंद, एक्स्प्रेस पंजाबमध्ये दाखल

Samjhauta Express: काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये धावणारी ट्रेन समझौता एक्स्प्रेस पाकिस्ताननं रोखली. कलम ३७० रद्द झाल्यानंतर पाकिस्तान बिथरल्यासारखं वागत आहेत.

samjhauta express
पाकिस्तानकडून समझौता एक्स्प्रेस बंद, वाघा बॉर्डर थांबवली एक्स्प्रेस   |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • पाकिस्तानकडून समझौता एक्स्प्रेस बंद
  • कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तान सैरभैर
  • पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी व्यापारी संंबंध तोडले

नवी दिल्लीः  जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाल्यासारखं वागत आहेत. बुधवारीच पाकिस्ताननं भारतासोबत व्यापारी संबंध तोडल्याचं म्हटलं. एनसीसीच्या बैठकीत त्यांनी याबाबतची घोषणा केली. यानंतर आज म्हणजेच गुरूवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये धावणारी समझौता एक्स्प्रेस बंद करण्याचा निर्णय पाकिस्ताननं घेतला आहे. पाकिस्तानी मीडियानुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये चालणारी लाहौर- दिल्ली समझौता एक्स्प्रेसला पाकिस्ताननं वाघा बॉर्डरवर थांबवली. 

काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानचं डोकं ठिकाणावर नाही आहे आणि समझौता एक्स्प्रेसच्या सेवेवर आज (गुरूवार) बंदी आणली. याआधी पाकिस्ताननं बुधवारी पंतप्रधान इमरान खान यांच्या अध्यक्षतेत राष्ट्रीय सुरक्षा समिती (एनएससी) ची बैठक घेतली. ज्यात भारतासोबत व्यावहारिक संबंध तोडणे आणि द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

 

 

दरम्यान ही एक्स्प्रेस संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पंजाबमध्ये परतली आहे. 

 

 

 

 

 

 

कशी आहे समझौता एक्स्प्रेस 

समझौता एक्स्प्रेस ही पाकिस्तान भारत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आहे. थार एक्स्प्रेस सुरू होण्यापूर्वी समझौता एक्स्प्रेस भारत पाकिस्तानला जोडणारं एकमेव रेल्वे आहे. २२ जुलै १९७६ रोजी सुरू झालेल्या समझौता एक्स्प्रेसला जवळपास ४० वर्षांपेक्षा जास्त वर्ष झालीत. पूर्वी अमृतसह ते लाहोर या ४२ किलोमीटरच्या मार्गावर ही ट्रेन सुरू होती. समझौता एक्स्प्रेस ही दिल्ली, अटारी आणि लाहोर मार्गावर आठवड्याला एकदा धावते. ही एक साप्ताहिक ट्रेन आहे. त्यावेळी ८० च्या दशकात पंजाबमधलं वातावरण बिघडू लागलं होतं. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय रेल्वेनं अटारीमधून समझौता एक्स्प्रेस बंद केली आणि आता ही ट्रेन अटारीपर्यंत जाते. 

 

सुरूवातीला या ट्रेनच्या दररोज फेऱ्या होत्या. त्यानंतर १९९४ साली या ट्रेनच्या साप्ताहित फेऱ्या सुरू झाल्या. पाकिस्तानमध्ये लाहोर तर भारतात दिल्ली असा या ट्रेनचा थांबा आहे. तर पाकिस्तानच्या आताच्या निर्णयाआधी २००२ ते २००४ या दोन वर्षांत समझौता एक्स्प्रेस बंद करण्यात आली होती. कारण त्यावेळी जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांनी भारतीय संसदेवर हल्ला केला होता. 

 

 

बुधवारी पाकिस्ताननं भारतासोबत आपले द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्यात निर्णय घेतला. यासोबतच निर्णय घेतला की, पाकिस्तान भारतासोबत आपले राजनैतिक संबंध देखील कमी करणार. याव्यतिरिक्त काश्मीरसंबंधी भारत सरकारनं घेतलेल्या निर्णयाबाबत सुरक्षा परिषदसह यूएनसमोर हा मुद्दा उपस्थित करणार आहे. भारतासोबत व्यवहार आणि बस सेवा बंद करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

याव्यतिरिक्त पाकिस्तान १५ ऑगस्टला भारताच्या स्वातंत्र्यतेच्या दिवशी काळा दिवस म्हणून घोषित करेल. पाकिस्ताननं तिथून भारताचे उच्चायुक्तांना परत पाठवण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत. तसंच पाकिस्तान आपल्या उच्चायुक्तांना देखील परत बोलावणार आहे. काही रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान वाघा- अटारी सीमा देखील बंद करण्याची शक्यता आहे. 

काश्मीरला विशेष दर्जा देणारा कलम ३७० रद्द करण्याच्या विधेयकाला भारताच्या संसदेत मंगळवारी मंजूरी मिळाली.  भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं की, कलम ३७० शी निगडीत सर्व घडामोडी या पूर्णपणे भारताची अंतर्गत बाब आहे. परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय राज्यघटना ही नेहमीच सार्वभौम आहे आणि अशीच राहिल. आमच्या भागात हस्तक्षेप करून चिंताजनक चित्र सादर करण्याचे पाकिस्तानचे पाऊल कधीही यशस्वी होणार नाही. 

भारतानं म्हटलं की, भारत सरकार पाकिस्तानद्वारे घोषित केलेल्या निर्णयांचा निषेध करते. पाकिस्ताननं भारतासोबत द्विपक्षीय संबंधांबद्दल काही एकतर्फी निर्णय घेतला आहे. यामध्ये आमची राजनैतिक संबंधांचा स्तर कमी करण्याचा समावेश आहे. जम्मू-काश्मीरशी संबंधित अशा घटनांकडे पाकिस्तानमध्ये नकारात्मक दृष्टीकोनातून पाहिलं जातं आणि या भावना सध्याच्या सीमापार दहशतवादाचे औचित्य सिद्ध करण्यासाठी वापरल्या जातात यात काही आश्चर्य नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...