Delhi News: राजधानीत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, सुरक्षा रक्षकाकडून PG मधल्या तरूणींचा विनयभंग

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 17, 2022 | 16:35 IST

Karol Bagh PG news: नशेच्या अवस्थेत सुरक्षा रक्षकाने तरूणींचा विनयभंग आणि मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे विनयभंगाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरही पोलिसांनी अद्याप याप्रकरणी कारवाई केलेली नाही.

थोडं पण कामाचं
  • राजधानी दिल्लीत (capital Delhi) महिलांच्या सुरक्षेबाबत धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी घटना समोर आली आहे.
  • करोल बागच्या (Karol bagh) गोल्ड्स व्हिला पीजीमध्ये राहणाऱ्या तरूणींची छेड काढण्यात आली आहे.
  • तरूणींच्या छेडछाडीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

नवी दिल्ली:  Karol Bagh PG molestation news: राजधानी दिल्लीत (capital Delhi) महिलांच्या सुरक्षेबाबत धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी घटना समोर आली आहे. येथे करोल बागच्या (Karol bagh) गोल्ड्स व्हिला पीजीमध्ये राहणाऱ्या तरूणींची छेड काढण्यात आली आहे. तरूणींची ही छेडछाड (molestation) काढणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकानं (security guard) काढली आहे.

तरूणींच्या छेडछाडीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी तरूणींच्या छेडछाडीचा व्हिडिओ ट्विट केला आणि दिल्ली पोलिसांना याप्रकरणी कठोर कारवाई करण्यास सांगितले.

अधिक वाचा-  IFFM अवॉर्ड्स 2022: 'हे' कलाकार ठरले पुरस्काराचे मानकरी

तरूणींना मारहाण

नशेच्या अवस्थेत सुरक्षा रक्षकाने तरूणींचा विनयभंग आणि मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे विनयभंगाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरही पोलिसांनी अद्याप याप्रकरणी कारवाई केलेली नाही. व्हिडिओमध्ये तो सुरक्षा रक्षक तरूणींकडे धावताना दिसत आहे. अन्य तरूणी त्यांच्या खोलीत धावतात पण तो व्यक्ती एका तरूणीला पकडतो आणि तिचा विनयभंग करताना दिसत आहे. या दरम्यान, तरूणी स्वत: ला सोडवण्याचा प्रयत्न करते. पीजीच्या मालकानंही या घटनेवर कोणतीही कारवाई केलेली नाही.

स्वाती मालीवाल यांनी पोलिसांकडून मागवला अहवाल

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर दिल्ली महिला आयोगाने पोलिसांना नोटीस दिली आहे. स्वाती मालीवाल यांनी बुधवारी संध्याकाळपर्यंत दिल्ली पोलिसांकडून कारवाईचा अहवाल मागवला आहे. दिल्लीचा करोल बाग हा अतिशय वर्दळीचा परिसर मानला जातो. पीजीमध्ये राहणाऱ्या मुली मोठ्या संख्येने येथे शिकतात आणि नोकरी करतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी