शाहिद आफ्रिदीचा भाऊ दहशतवादी, २००३ मध्ये काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने केला खात्मा

लोकल ते ग्लोबल
Updated Jul 11, 2018 | 18:43 IST | Times Now

काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील शोपियां आणि अनंतनागमध्ये भारतीय सुरक्षारक्षकांसोबत झालेल्या चकमकीत अनेक दहशतवादी मारले गेले.

Shahhid Afridi's cousin was a Harkat ul-Ansar terrorist
शाहिद आफ्रिदीचा भाऊ दहशतवादी होता  |  फोटो सौजन्य: Times Now

नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी याचा भाऊ दहशतवादी होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. २००३ साली भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईत शाकिब मारला गेला होता. शाकिब हा शाहिद आफ्रिदीचा चुलत भाऊ होता आणि तो जवळपास दोन वर्ष अनंतनाग परिसरात होणाऱ्या दहशतवादी कारवायांत सक्रिय होता.

पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी ऑलराऊंडर शाहिद आफ्रिदीने काश्मीर संदर्भात ट्विट करुन आग ओकण्याचं काम केलं. या ट्विटनंतर भारताकडूनही अनेक दिग्गजांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील शोपियां आणि अनंतनागमध्ये भारतीय सुरक्षारक्षकांसोबत झालेल्या चकमकीत अनेक दहशतवादी मारले गेले. यानंतर शाहिद आफ्रिदीने ट्विट करत 'भारताच्या ताब्यातील काश्मीर' असं म्हटलं आहे.

शाहिद आफ्रिदीने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "भारताच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमध्ये खूपच वाईट आणि चिंताजनक परिस्थिती आहे. निर्दोष नागरिकांच्या स्वातंत्र्याचा आवाज दाबण्यासाठी त्यांना मारलं जात आहे. संयुक्त राष्ट्र (यूएन) आणि इतर आंतरराष्ट्रीय दल कुठे आहेत माहित नाही, हा सर्व प्रकार रोखण्यासाठी ते काही पाऊलं उचलत का नाहीयेत."

सप्टेंबर २००३ मध्ये अनंतनाग येथे भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईत शाकिब हा मारला गेला. शाकिब हा हरकत-उल-अन्सार दहशतवादी संघटनेशी जोडला होता. तो अनंतनागमध्ये दोन वर्षांपासून सक्रिय होता.

वादग्रस्त ट्विट केल्यानंतर शाहिद आफ्रिदीने स्पष्टीकरण देताना आणखीन एक ट्विट केलं आहे. या ट्विट मध्ये त्याने भारताच्या झेंड्यासोबत काढलेला एक फोटोही पोस्ट केला. या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, "आम्ही सर्वांचा आदर करतो आणि हे एका खेळाडूचं उदाहरण आहे. पण जेव्हा मानवाधिकारांचा प्रश्न उद्भवतो त्यावेळी आमच्या साध्याभोळ्या काश्मीरींचाही आदर केला पाहिजे असं आम्हाला वाटतं."

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी