द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी शंकराचार्य सरस्वती यांचे निधन

Shankaracharya Of Dwarka Sharda Peeth Swami Shankaracharya Saraswati Died At The Age Of 99 : द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी शंकराचार्य सरस्वती यांचे निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते.

Swami Shankaracharya Saraswati
स्वामी शंकराचार्य सरस्वती यांचे निधन  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • स्वामी शंकराचार्य सरस्वती यांचे निधन
  • द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य
  • ९९व्या वर्षी निधन

Shankaracharya Of Dwarka Sharda Peeth Swami Shankaracharya Saraswati Died At The Age Of 99 : ज्योतिष आणि द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी शंकराचार्य सरस्वती यांचे निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. स्वामी शंकराचार्य सरस्वती यांनी नरसिंहपूरमधील झोतेश्वर परमहंसी गंगा आश्रम येथे आज (रविवार ११ सप्टेंबर २०२२) दुपारी साडेतीन वाजता अखेरचा श्वास घेतला.

भारतात तेराशे वर्षांपूर्वी आदी गुरु भगवान शंकराचार्य यांनी सनातन  धर्माचा विचार सर्व दूर पसरविण्यासाठी चार पीठांची निर्मिती केली. या पीठांच्या प्रमुखपदी शंकराचार्य नियुक्त केले. द्वारका मठ आणि ज्योतिर मठ यांचे मिळून तयार केलेल्या पीठाचे शंकराचार्य म्हणून जगतगुरु स्वामी स्वरूपानंद सरस्वती कार्यरत होते. त्यांचा ९५वा वाढदिवस वृंदावन येथे २०१८ मध्ये साजरा झाला. जगतगुरु स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा जन्म १९२४ मध्ये झाला. त्यांनी सनातन धर्मासाठी मोठे कार्य केले.

स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांचा अल्प परिचय

स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांचा जन्म मध्यप्रेदशमधील सिवनी जिल्ह्यातील जबलपूर येथील दिघोरी गावातील ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांच्या आई वडिलांनी त्यांचं नाव पोथीराम उपाध्याय असं ठेवलं होतं. वयाच्या ९ व्या वर्षी घराबाहेर पडून त्यांनी धर्मकार्याला सुरुवात केली. यानंतर ते उत्तर प्रदेशच्या काशमीमध्ये त्यांनी ब्रह्मलीन श्री स्वामी करपात्री महाराज यांच्याकडून वेद, वेदांग आणि शास्त्राचं शिक्षण घेतलं. १९४२ मध्ये ते क्रांतिकारी साधू म्हणून प्रसिद्ध झाले होते.

  1. जगतगुरु स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांना १९८१ मध्ये शंकराचार्य ही उपाधी देण्यात आली.
  2. जगतगुरु स्वामी स्वरूपानंद सरस्वती क्रांतीकारी साधू या नावाने ओळखले जायचे.
  3. ते इंग्रजांविरोधात स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते. सहा महिने तुरुंगात गेले होते.
  4. राम मंदिरासाठी आंदोलनात सहभागी झाले होते
  5. हिंदू धर्माचे मोठे आधात्मिक गुरु अशी शंकराचार्य यांची ओळख होती.
  6. वयाच्या नवव्या वर्षापासून धर्माच्या क्षेत्रात चांगल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मोठे काम केले
  7. शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला जाऊ नये अशी त्यांनी भूमिका मांडली. ते त्यांच्या भूमिकेवर अखेपर्यंत कायम होते.

धोकादायक कुत्र्यांवर जगातील अनेक देशांत बंदी

शुभमन आणि सारा अली खानची डिनर डेट

कोणत्या राशीसाठी कोणत्या राशीचा जोडीदार

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी