धक्कादायक व्हिडिओ :   घटस्फोटित पत्नी आणि मुलीला गोळ्या घालून स्वतः केली आत्महत्या 

बिहारची राजधानी पाटणा येथील अनिसाबादमध्ये एका व्यक्तीने आपली घटस्फोटित पत्नी आणि मुलीवर भरदिवसा रस्त्याच्या मधोमध गोळ्या झाडल्या आणि नंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

Shocking Video divorced wife and daughter shot then committed suicide
घटस्फोटित पत्नी आणि मुलीला गोळ्या घालून स्वतः केली आत्महत्या 
थोडं पण कामाचं
  • बिहारची राजधानी पाटणा येथील अनिसाबादमधील धक्कादायक व्हिडिओ समोर
  • एका व्यक्तीने आपली घटस्फोटित पत्नी आणि मुलीवर भरदिवसा रस्त्याच्या मधोमध गोळ्या झाडल्या
  • नंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथील अनिसाबाद पोलीस लाईनमध्ये एका व्यक्तीने आपली घटस्फोटित पत्नी आणि मुलीची गोळ्या झाडून हत्या केली त्यानंतर स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. घटनास्थळावरून एक पिस्तूल आणि तीन वापरलेली काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. (Shocking Video divorced wife and daughter shot then committed suicide )

पाटणाचे एसएसपी मानवजीत सिंह ढिल्लन म्हणाले की, आम्हाला तिहेरी हत्याकांडाची माहिती मिळाली आणि आम्ही अनिसाबादमध्ये घटनास्थळी पोहोचलो. आम्ही सध्या सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत. आरोपी राजीव कुमारने त्याची दुसरी पत्नी आणि मुलीची गोळ्या झाडून हत्या केली आणि नंतर 7 मिमीच्या पिस्तुलाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

एसएसपी म्हणाले की, आरोपीला पहिल्या पत्नीपासून मुलगी आहे; पहिल्या पत्नीचा नैसर्गिक कारणाने मृत्यू झाला. त्यानंतर त्याने पत्नीच्या बहिणीशी लग्न केले आणि नंतर त्यांचा घटस्फोट झाला. आपली मुलगी आपल्यासोबत असावी असे त्याला वाटत होते पण मुलीने तसे केले नाही. त्याने गोळ्या झाडल्या तेव्हा तो बेगुसराय येथून त्यांचा पाठलाग करत होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी