नवी दिल्ली: Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. दिल्ली पोलिसांना आता 18 ऑक्टोबरचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले आहेत. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये श्रद्धाची हत्या करणारा आरोपी आफताब दिसतोय.श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने तिच्या शरीराचे 35 तुकडे केले आणि ते फ्रीजमध्ये ठेवले होते. त्याने 300 लीटरचा फ्रिजही खरेदी केला होता.
त्यानंतर दररोज रात्री तो श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे मेहरौलीच्या जंगलात फेकायचा.सीसीटीव्ही फूटेजमध्ये आफताब एक बॅग घेऊन जाताना दिसत आहे.
हे तुकडे फेकण्यासाठी तो जंगलात तीनदा गेला होता. पोलीस मेहरौलीच्या जंगलाव्यतिरिक्त गुरुग्रामपासून दिल्लीपर्यंत अनेक भागात शोध मोहीम राबवत आहेत.
दिल्ली पोलिसांची एक टीम हिमाचल प्रदेशातल्या पार्वती घाटी या ठिकाणी असलेल्या तोष गावात ही टीम गेली आहे. एप्रिल महिन्यात श्रद्धा आणि आफताब यांनी हिमाचलला भेट दिली होती. तेव्हा ते येथील एका गेस्ट हाऊसमध्ये थांबले होते. पोलीस स्थानिकांची चौकशी करणार आहेत.