Shraddha Murder Case : नवी दिल्ली : श्रद्धा हात्याकांडातील दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. आफ़ताब हा साधासुधा गुन्हेगार नसून त्याने अतिशय थंड डोक्याने श्रद्धाचा खून केला. आणि तिचे तुकडे तुकडे केले होते. इतकेच नाही तर श्रद्धाचा मृतदेह घरात ठेवून तो इतर तरुणींसोबत रोमान्स करत होता. पोलीस चौकशीत ही धक्कादायक बाब समोर येत आहे. (shraddha murderer aaftab was dating another girl was interrogated by delhi police)
श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफ़ताबने तिच्या शरीराचे तुकडे तुकडे केले होते. त्यानंतर आफ़ताबने हे तुकडे घरातच ठेवले होते. असे असताना आफ़ताबची डेटिंग ऍपवरून एका तरुणीसोबत ओळख झाली होती. तिला भेटण्यासाठी आफ़ताबने घरीही बोलावले होते. ज्या घरात श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे ठेवले होते त्याच घरात आफ़ताब दुसर्या तरुणीसोबत रोमान्स करत होता.