Smriti Irani attacks Rahul Gandhi : विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे संसदेचे कामकाज वारंवार तहकूब झाले. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर थेट हल्ला केला. राजकीयदृष्ट्या राहुल गांधी अनुत्पादक आहेत, असे स्मृती इराणी म्हणाल्या. राहुल गांधी संसदेत कमीत कमी कामकाज व्हावे यासाठी प्रयत्न करत आहेत. देशातल्या नागरिकांची इच्छा संसदेत जनहिताच्या विषयांवर सर्वांगीण चर्चा व्हावी अशी आहे. यासाठी जास्तीत जास्त कामकाज व्हायला हवे; असे स्मृती इराणी म्हणाल्या. पक्षाची आवश्यकता आणि राहुल गांधी यांचं परदेश दौरे यांचा एकत्रित विचार केल्यास राहुल गांधी हेच काँग्रेससाठी एक चिंतेचा विषय झाले आहेत; असेही स्मृती इराणी म्हणाल्या.
पंजाबमध्ये सिद्धू मुसेवालाचे मारेकरी आणि पोलिसांत उडाली चकमक
राहुल गांधी राजकीयदृष्ट्या अनुत्पादक आहेत आणि ते संसदेत कमीत कमी कामकाज व्हावे यासाठी प्रयत्न करत असल्याचे स्मृती इराणी म्हणाल्या. संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलै २०२२ पासून सुरू झाले. पण विरोधक गोंधळ घालत असल्यामुळे दररोज वारंवार संसदेचे कामकाज तहकूब (स्थगित) करावे लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना शांतता राखून चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन केले. पण विरोधक जीएसटी, महागाई या मुद्यांवर घोषणाबाजी करत गोंधळ घालत राहिले. आपले म्हणणे चर्चेच्या माध्यमातून सरकारपुढे मांडावे असे पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना आवाहन केले पण विरोधक चर्चेऐवजी गोंधळ घालण्याला प्राधान्य देताना दिसले.
शौचालयाचा खड्डा खणायला गेले अन् खजिना घेऊन पळाले; काम करताना हाताला लागलं ब्रिटिशकालीन सोनं
अमेठीचे खासदार असताना राहुल गांधी यांनी संसदेत प्रश्न विचारले नाही. अमेठी सोडून वायनाडला गेल्यावर खासदार राहुल गांधींनी संसदेच्या कामकाजात जेमतेम ४० टक्के उपस्थिती दर्शविली. राहुल गांधी यांनी संसदेत कधीही कोणतेही खासगी विधेयक सादर केलेले नाही. आता तर राहुल गांधी संसदेत कामकाज कमी व्हावे यासाठीच प्रयत्न करताना दिसत आहेत; असे स्मृती इराणी म्हणाल्या.
संसदेचे पावसाळी अधिवेशन १२ ऑगस्ट २०२२ पर्यंत आहेत. या कालावधीत जास्तीत जास्त विषयांवर सर्वांगीण चर्चा करून जनहितासाठी कायदे करणाऱ्यावर केंद्र सरकारचा भर आहे. पण विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे पहिल्या तीन दिवसांच्या कामकाजाला वारंवार तहकूब करावे लागले, असे स्मृती इराणी म्हणाल्या. यंदाच्या अधिवेशनात २४ विधेयकांना संसदेची मंजुरी मिळविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.