Sonali Phogat: मृत्यूपूर्वीचा शेवटचा व्हिडिओ आला समोर, पार्टीतील CCTV फुटेजमध्ये नेमकं काय?, पाहा VIDEO

Sonali Phogat CCTV: भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या निधनानंतर अनेक नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. त्यातच आता एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आणि त्यातून अनेक गोष्टींचा उलगडा होताना दिसत आहे. 

Sonali Phogat death case update cctv footage recovered by goa police
Sonali Phogat: मृत्यूपूर्वीचा शेवटचा व्हिडिओ आला समोर, पार्टीतील CCTV फुटेजमध्ये नेमकं काय?, पाहा VIDEO 
थोडं पण कामाचं
  • ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे सोनाली फोगाट यांचा मृत्यू? 
  • पार्टीतील सीसीटीव्ही फुटेज गोवा पोलिसांच्या हाती
  • सोनालीच्याच सहकाऱ्यांनी तिला जबरदस्तीने ड्रग्ज दिल्याचा दावा 

Sonali Phogat death cctv footage: टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांच्या मृत्यूपूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. आपल्या मृत्यूपूर्वी सोनाली फोगाट या नशेत असल्याचं सीसीटीव्हीत दिसून येत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, काळ्या रंगाचा टी शर्ट परिधान केलेला एक व्यक्ती सोनाली यांना पकडून घेऊन जात आहे. 

टाइम्स नाऊ नवभारतसोबत बोलताना गोव्याचे डीजीपी जसपाल सिंह यांनी म्हटलं, सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणात तपास सुरू आहे. आतापर्यंत आम्ही कुठल्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो नाहीये. आम्ही सर्वच अँगल्सने या प्रकरणाचा तपास करत आहोत.

दोन तास बाथरूममध्ये 

यापूर्वी पणजीचे आयजी यांनी म्हटलं होतं की, सोनाली यांना आरोपींनी काही नशेचे पदार्थ दिले होते. त्यानंतर सोनाली स्वत:ला सावरु शकत नव्हती. पोलिसांनी सोनालीचा पीए सुधीर सांगवान आणि मित्र सुखविंदर या दोघांनाही अटक करुन तपास सुरू केला आहे. त्यांच्या चौकशीत सांगवान याने मान्य केले की त्यांनी फोगाट हिला नशेचे पदार्थ दिले. त्यानंतर फोगाटची प्रकृती बिघडली आणि मग तिला ते बाथरूममध्ये घेऊन गेले. बाथरूममध्ये जवळपास दोन तास ते होते. तेथे नेमकं काय घडलं याबाबत अद्याप त्यांनी काहीही माहिती दिली नाहीये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी