Sonali Phogat: तीन वर्षांपासून सुरू असलेल्या ब्लॅकमेलिंगचा बळी ठरल्या सोनाली फोगाट, शरीरावरील जखमांनी तपासाला दिली नवी दिशा

Sonali Phogat was a victim of blackmailing for 3 years, five marks of injury turn sonali phogat case : हरयाणा भाजपच्या नेत्या सोनाली फोगाट यांचा गोव्यातील हॉटेलमध्ये मृत्यू झाला. आधी मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका हे सांगण्यात आले. आता पोलिसांनी हत्येच्या संशयातून तपास सुरू केला आहे.

Sonali Phogat was a victim of blackmailing for 3 years, five marks of injury turn sonali phogat case
तीन वर्षांपासून सुरू असलेल्या ब्लॅकमेलिंगचा बळी ठरल्या सोनाली फोगाट  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • तीन वर्षांपासून सुरू असलेल्या ब्लॅकमेलिंगचा बळी ठरल्या सोनाली फोगाट
  • शरीरावरील जखमांनी तपासाला दिली नवी दिशा
  • सोनाली फोगाट यांचा मॅनेजर सुधीर सांगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर या दोघांना पकडले

Sonali Phogat was a victim of blackmailing for 3 years, five marks of injury turn sonali phogat case : हरयाणा भाजपच्या नेत्या सोनाली फोगाट यांचा गोव्यातील हॉटेलमध्ये मृत्यू झाला. आधी मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका हे सांगण्यात आले. आता पोलिसांनी हत्येच्या संशयातून तपास सुरू केला आहे. हत्येच्या संशयावरून पोलिसांनी सोनाली फोगाट यांचा मॅनेजर सुधीर सांगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर या दोघांना पकडले आहे.

सोनाली फोगाट यांना त्यांचाच मॅनेजर सुधीर सांगवान ब्लॅकमेल करत होता. सुधीर याने सोनाली यांचा शारीरिक छळ पण केला होता असा संशय व्यक्त होत आहे. या संशयावरून पोलीस तपास सुरू आहे.

सोनाली फोगाट, सुधीर सांगवान, सुखविंदर हे तिघेजण गोव्यातील हॉटेलमध्ये आल्याची माहिती हॉटेलच्या मालकाने पोलिसांना दिली. हॉटेलमध्ये मालक वगळता इतरांना सोनाली फोगाट भाजपच्या नेत्या असल्याची माहिती नव्हती. सर्वजण त्यांना हॉटेलमध्ये आलेल्या इतर पाहुण्यांसारखेच समजत होते; असेही हॉटेल मालकाने सांगितले. 

सुधीर सांगवानने शारीरिक छळ केल्यामुळेच सोनाली फोगाट यांच्या शरीरावर पाच जखमा झाल्याच्या खुणा दिसत आहेत, असा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणी सविस्तर शवविच्छेदन अहवाल येण्याची वाट पोलीस पथक बघत आहे.

सोनाली फोगाट यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सुधीर सांगवान याच्या वर्तनाविषयी संशय व्यक्त केला आहे. यामुळे पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर सांगवान सोनाली फोगाट यांना तीन वर्षांपासून ब्लॅकमेल करत होता आणि त्याने शारीरिक छळ करून सोनाली यांच्यावर अत्याचार केले अशी माहिती पोलिसांच्या हाती आहे. या प्रकरणी तपास करून ठोस पुराव्यांची भिंत उभी करण्याचे काम पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी