आयपीएस अधिकाऱ्याची पत्नीला बेदम मारहाण, व्हिडिओ झाला व्हायरल

Purushottam Sharma Video: मध्य प्रदेशचे स्पेशल डीजी पुरुषोत्तम शर्मा यांचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यात ते आपल्या पत्नीला निर्घृणपणे मारहाण करीत आहे.

special dg purushottam sharma caught beating his wife video goes viral 
आयपीएस अधिकाऱ्याची पत्नीला बेदम मारहाण, व्हिडिओ झाला व्हायरल  |  फोटो सौजन्य: Times Now

भोपाळ: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे एक धक्कादायक घटना घडली असून या घटनेचा आता व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये मध्य प्रदेशातील विशेष महासंचालक पुरुषोत्तम शर्मा यांचा आहे. ज्यामध्ये ते आपल्या पत्नीला बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे.  व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, पोलीस अधिकारी पुरुषोत्तम हे आपल्या पत्नीला अत्यंत विचित्र पद्धतीने मारहाण करत आहेत. दरम्यान, डीजी पुरुषोत्तम यांचे दोन व्हिडिओ समोर आले आहेत. एका व्हिडिओमध्ये, त्यांच्या  पत्नीने त्यांना दुसर्‍या महिलेसह आक्षेपार्ह स्थितीत पकडलं. यानंतर दोघांमध्ये बराच वाद झाला.

मीडिया रिपोर्टनुसार शर्मा यांच्या मुलाने यासंबंधी डीजीपीकडे तक्रार केली असून हा व्हिडिओ देखील पाठविला आहे. यावेळी मुलाने वडिलांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पुरुषोत्तम शर्मा यापूर्वीही वादात अडकले होते. जेव्हा ते सायबर सेल आणि एसटीएफचे स्पेशल डीजी होते, तेव्हा हनी ट्रॅपमध्ये त्यांचे नाव पुढे आले होते. तेव्हा त्यांनी हे आरोप फेटाळून लावले. त्यानंतर पुरुषोत्तम शर्मा यांनी पोलिस महासंचालक (डीजी) व्ही.के. सिंग यांच्यावर आरोप केला होता की, ते पोलीस विभागाची प्रतिमा खराब करत आहेत.

दरम्यान, माराहाणीच्या या व्हिडिओवर पुरुषोत्तम शर्मा यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे की, '२००८मध्येही माझ्या पत्नीने माझ्याविरोधात तक्रार कली होती मात्र असा सवाल उठतो की २००८ पासून आतापर्यंत १२ वर्षांपासून ती माझ्या घरात राहत आहे. माझ्याच पैशाने परदेशात जात आहे. जर माझा स्वभाव असा असता तर आधीच तक्रार आली असती. माझ्या संपूर्ण घरात तिने कॅमेरे लावले आहेत. जर मारहाणाची प्रश्न असता तर सेल्फ डिफेन्सही असतो. मी आणि माझ्या मुलाला संपूर्ण स्वातंत्र्य दिलेआहे. जर त्यांना वाटत असेल की मी वाईट आहे तर माझ्यावर कारवाई झाली पाहिजे.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी