VIDEO : वैष्णोदेवी भवनात कशी झाली चेंगराचेंगरी, भाविकांनी दिली माहिती

Stampede in Mata Vaishno Devi Bhawan, how it's happened, pilgrims share information watch video : जम्मू काश्मीरमध्ये माता वैष्णोदेवी भवनच्या प्रवेशद्वार क्रमांक तीन येथे झालेल्या चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू झाला आणि २६ जण जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. चेंगराचेंगरी कशी झाली यासंदर्भात भाविकांनी 'टाइम्स नाउ नवभारत'च्या प्रतिनिधीला माहिती दिली.

Stampede in Mata Vaishno Devi Bhawan, how it's happened, pilgrims share information watch video
VIDEO : वैष्णोदेवी भवनात कशी झाली चेंगराचेंगरी, भाविकांनी दिली माहिती 
थोडं पण कामाचं
  • VIDEO : वैष्णोदेवी भवनात कशी झाली चेंगराचेंगरी, भाविकांनी दिली माहिती
  • चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू आणि २६ जण जखमी
  • मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Stampede in Mata Vaishno Devi Bhawan, how it's happened, pilgrims share information watch video : कटरा : जम्मू काश्मीरमध्ये माता वैष्णोदेवी भवनच्या प्रवेशद्वार क्रमांक तीन येथे झालेल्या चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू झाला आणि २६ जण जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. मदतकार्य सुरू आहे. अनेक जखमींना कटरा येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. मृतांचे शवविच्छेदन सुरू आहे. 

चेंगराचेंगरी कशी झाली यासंदर्भात भाविकांनी 'टाइम्स नाउ नवभारत'च्या प्रतिनिधीला माहिती दिली. 'नव्या वर्षाची सुरुवात माता वैष्णोदेवीच्या आशीर्वादाने करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आले होते. लवकर दर्शन घेण्यासाठी काही जणांनी घाईने पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि चेंगराचेंगरी झाली'; असे भाविकांनी सांगितले.  

चेंगराचेंगरी प्रकरणी प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली जाईल तसेच घटनास्थळी उपस्थित असलेल्यांची चौकशी करुन चेंगराचेंगरीचे कारण शोधले जाईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी