सिद्धूला १ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

Supreme Court Sentences Navjot Singh Sidhu For One Year Imprisonment in 1988 Road Rage Case : माजी पंजाब काँग्रेस अध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू याला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. सर्वोच्च न्यायालयाने १९८८च्या एका जुन्या रोड रेज प्रकरणात सिद्धूला शिक्षा ठोठावली.

Supreme Court Sentences Navjot Singh Sidhu For One Year Imprisonment in 1988 Road Rage Case
सिद्धूला १ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • सिद्धूला १ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा
  • रोज रेजचे प्रकरण १९८८चे
  • पार्किंगवरून झालेल्या वादात एकाचा मृत्यू झाला होता

Supreme Court Sentences Navjot Singh Sidhu For One Year Imprisonment in 1988 Road Rage Case : नवी दिल्ली : माजी पंजाब काँग्रेस अध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू याला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. सर्वोच्च न्यायालयाने १९८८च्या एका जुन्या रोड रेज प्रकरणात सिद्धूला शिक्षा ठोठावली. पंजाब हरयाणा कोर्टाने आधी या प्रकरणात तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूला ठोस पुराव्यांअभावी निर्दोष सोडले होते. पण नवे पुरावे सादर झाल्याचे कारण देत सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा निर्णय बदलला. सिद्धूला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. 

रोज रेजचे प्रकरण १९८८चे आहे. पार्किंगवरून वाद झाला. सिद्धूने रागाचा भरात हात उगारला. सिद्धूचा मार लागल्यामुळे ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण न्यायालयात गेले. कनिष्ठ न्यायालयाने १९९९ मध्ये सिद्धूला ठोस पुराव्यांभावी निर्दोष सोडले. पंजाब हरयाणा न्यायालयाने सिद्धूला दोषी ठरवून तीन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. सिद्धूने २०१८ मध्ये एक हजार रुपयांचा दंड भरून जामिनावर स्वतःची सुटका करून घेतली. यानंतर सिद्धूच्या याचिकेवर पुनर्विचार याचिका दाखल झाली. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. सिद्धूला दोषी ठरवून एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा केली. सिद्धूने समाजकार्य करण्याच्या बदल्यात शिक्षेत माफी देण्याची मागणी केली आहे. 

काय आहे प्रकरण ?

पार्किंगवरून वाद झाला आणि सिद्धूने ६५ वर्षांच्या गुरमित सिंह यांना मारहाण केली. गुरमित यांच्या कारची चावी फेकून देऊन सिद्धू कोणतीही वैद्यकीय मदत न देता निघून गेला. मदतीअभावी गुरमित यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात सप्टेंबर १९९९ मध्ये सिद्धूला निर्दोष सोडण्यात आले. पण २००६ मध्ये पंजाब हरयाणा कोर्टाने त्याला दोषी ठरविले. सिदधूने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी