Air Base: सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, अंबाला एअरफोर्स स्टेशनजवळ दोन दिवस दिसले संशयास्पद ड्रोन

लोकल ते ग्लोबल
Pooja Vichare
Updated Aug 17, 2022 | 16:05 IST

Ambala Air Force Station: 13 आणि 15 ऑगस्ट रोजी येथील एअरबेसजवळ आकाशात संशयास्पद ड्रोन (drone) उडताना दिसले होते. एअरफोर्स स्टेशनच्या (Air Force Station)  तीन किलोमीटर परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी आहे.

Drone
महत्त्वाच्या एअरफोर्स स्टेशनजवळ दिसले संशयास्पद ड्रोन  
थोडं पण कामाचं
  • अंबाला येथील हवाई दलाच्या सुरक्षेत (Air Force security)  त्रुटी आढळून आल्या आहेत.
  • एअरफोर्स स्टेशनच्या (Air Force Station)  तीन किलोमीटर परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी आहे.
  • तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हरियाणा: Ambala air base: अंबाला येथील हवाई दलाच्या सुरक्षेत (Air Force security)  त्रुटी आढळून आल्या आहेत. 13 आणि 15 ऑगस्ट रोजी येथील एअरबेसजवळ आकाशात संशयास्पद ड्रोन (drone) उडताना दिसले होते. एअरफोर्स स्टेशनच्या (Air Force Station)  तीन किलोमीटर परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी आहे. असे असले तरी, ड्रोन दिसणे ही सुरक्षेतील मोठी चूक मानली जाते. तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

संशयास्पद ड्रोन पाहिल्यानंतर एएसपी पूजा डबला यांनी सांगितले की, आम्हाला अंबाला एअरफोर्स स्टेशनकडून तक्रार मिळाली आहे की  15 ऑगस्ट रोजी लाल रंगाचा ड्रोन दिसला होता. 13 ऑगस्टलाही असेच ड्रोन दिसल्याचे सांगितले जात आहे. तक्रार नोंदवल्यानंतर तपास सुरू करण्यात आला आहे. अंबालासारख्या महत्त्वाच्या एअरबेसजवळ संशयास्पद ड्रोन दिसल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी सुरक्षा वाढवली आहे.  

अधिक वाचा-  बाथरूममध्ये ठेवा 'या' रंगाची बादली, वास्तुदोष दूर होऊन फळफळेल नशीब

येथे तैनात आहे राफेल विमान

रणनीती आणि ऑपरेशनच्या दृष्टीने हा एअरबेस पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांचे लक्ष्य आहे. येथून या दोन देशांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाते. राफेलच्या सुरक्षेबाबत हवाई दलाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असताना प्रशासनानेही त्याच्या सुरक्षेबाबत सूचना दिल्या आहेत.

2020 मध्ये अंबाला एअरबेसवरच राफेलचा औपचारिकपणे भारतीय हवाई दलात समावेश करण्यात आला. ज्यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि संरक्षण मंत्री फ्रान्सहून अंबाला येथे आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी