Car under Plane : अचानक Indigo च्या विमानाखाली आली कार, थोडक्यात टळला मोठा अपघात, पाहा VIDEO

इंडिगोचं विमान टेकऑफ घेण्यासाठी सज्ज झालं होतं. कुठल्याही क्षणी हे विमान धावपट्टीकडे आपला प्रवास सुरू करणार होतं. तेवढ्यात अचानक एक कार विमानाखाली गेली.

Car under Plane
अचानक Indigo च्या विमानाखाली आली कार  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • इंडिगोचं विमान होतं उड्डाणाच्या तयारीत
  • अचानक विमानाखाली आली कार
  • थोडक्यात टळला गंभीर अपघात

Car under Plane : नवी दिल्लीहून ढाकाकडे उड्डाण घेण्यासाठी सज्ज असलेल्या विमानाखाली अचानक एक कार आली. विमानाच्या ‘नोज व्हील’ला म्हणजेच पुढच्या चाकाला धडक देण्यासाठी केवळ काही इंचांचं अंतर शिल्लक होतं. मात्र तेवढ्यात ड्रायव्हरने करकचून ब्रेक दाबल्याने संभाव्य अपघात टळला. इंडिगोचं ‘ए 320 नियो’ हे विमान बांग्लादेशची राजधानी ढाकाकडे जाण्यासाठी उड्डाण घेत असताना अचानक ‘गो फर्स्ट’ कंपनीची मारुती स्विफ्ट डिजायर कार विमानाच्या दिशेने जाताना सर्वांनी पाहिली. नेमका हा काय प्रकार घडतोय, हे समजायच्या आता ही कार विमानाच्या खाली गेली आणि चाकापाशी जाऊन थांबली. पायलटने प्रसंगावधान राखत विमान जागीच रोखून ठेवल्याने मोठा अपघात टळला. 

अशी घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली विमानतळावर इंडिगो कंपनीचं VT-ITJ हे विमान स्टँड नंबर 201 वर थांबलं होतं. गो ग्राऊंड कंपनीची मारूती स्विफ्ट कार अचानक या विमानाच्या दिशेने आली आणि थेट विमानाखाली जाऊनच थांबली. विमानाच्या पुढच्या भागाखाली ही कार गेली आणि करकचून ब्रेक लावून तिथे थांबली. विमानाच्या चाकाला ही कार जोरदार धडकण्याची शक्यता होती, मात्र हा अपघात थोडक्यात टळला. यात विमानाचं काहीही नुकसान झालेलं नाही. कुणी व्यक्तीदेखील जखमी झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. 

अधिक वाचा - Car under Plane : अचानक Indigo च्या विमानाखाली आली कार, थोडक्यात टळला मोठा अपघात, पाहा VIDEO

ड्रायव्हरची टेस्ट

कारचा ड्रायव्हर नशेत होता का, हे तपासण्यासाठी त्याची ब्रेन ॲनालायजर टेस्टही करण्यात आली. मात्र ही टेस्ट निगेटिव्ह आली असून कारचा चालक पूर्णतः शुद्धीत असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यानंतर ही कार मागे घेण्यात आली आणि नियोजित वेळेत विमानाचं उड्डाणही झालं. मात्र अचानक ही कार विमानाखाली आलीच कशी, याची चौकशी आता सुरू कऱण्यात आली आहे.

अधिक वाचा - Russia Tourism : रशियाने उडवली अमेरिका-युरोपची खिल्ली, पर्यटनाच्या या व्हिडिओची जगभर चर्चा

डीएएस-एनआर कार्यालयाकडून याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

याबाबत आतापर्यंत तरी विमान कंपनी इंडिगो आणि कारची मालकी असणारी कंपनी ‘गो फर्स्ट’ यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी