Manish Sisodia यांच्यावर अटकेची तलवार, जाणून घ्या काय असते Lookout नोटीस

What is Lookout Notice: दिल्लीतील दारुबाबतचं धोरण हा एक आता राजकीय वाद बनला आहे. छापेमारीनंतर आता दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

sword of arrest hangs on delhi dcm manish sisodia know what is  lookout notice
Manish Sisodia यांच्यावर अटकेची तलवार, जाणून घ्या काय असते Lookout नोटीस  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • मनिष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ
  • सीबीआयने मनिषा सिसोदियांविरोधात जारी केली लूकआऊट नोटीस
  • दारुबाबतच्या धोरण प्रकरणी मनिष सिसोदियांना अटक होण्याची शक्यता आहे.

Lookout Circular Against Manish Sisodia: नवी दिल्ली: Delhi चे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Deputy CM Manish Sisodia)यांच्याविरोधात मोठी कारवाई करताना CBI ने Lookout Notice जारी केली आहे. जेव्हा सीबीआयला वाटतं की, एखादा आरोपी देश सोडून पळून जाऊ शकतो तेव्हा ते त्या आरोपीविरोधात लूकआऊट नोटीस जारी करतात. यानंतर तो आरोपी देश सोडून बाहेर जाऊ शकत नाही. 

काय आहे लूकआऊट नोटीस?

केंद्रीय तपास यंत्रणेद्वारे फरार व्यक्ती आरोपी हा देशातून पळून जाऊ नये हे निश्चित करण्यासाठी एक लूक आऊट सर्क्यूलर (LoC) जारी केलं जात. हे मुख्यतः आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि बंदरांवर इमिग्रेशन शाखेद्वारे वापरले जाते. काही प्रकरणांमध्ये, एखाद्या व्यक्तीच्या देशाबाहेरच्या हालचालींवर निर्बंध घालण्यासाठी पोलीस न्यायालयाकडे जाऊ शकतात. दरम्यान, लूकआऊट नोटीसीला आरोपी कोर्टात जाऊन आव्हान देऊ शकतं आणि याबाबत दिलासा देखील मिळवू शकतं. 

अधिक वाचा: Serial Woman Burglar : विमानाने जाऊन करायची चोऱ्या, 100 गुन्हे केल्यावर भरला पापांचा घडा

  1. आरोपीला देशाबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
  2. इमिग्रेशन चेक पॉइंट म्हणजे सी पोर्ट
  3. देश सोडून जाण्याचा प्रयत्न केल्यास अटक होण्याची शक्यता
  4. तपास यंत्रणा लूकआउट नोटीस जारी करतात
  5. मुख्यतः ईडी, सीबीआय नोटीस जारी करतात

सिसोदिया यांचे ट्विट

या लूकआऊट नोटीसवर मनीष सिसोदिया यांनी ट्विट करत म्हटले की, 'तुमचे सर्व छापे अयशस्वी ठरले आहेत, काहीही सापडलेले नाही, एक पैशाची चोरी सापडली नाही, आता तुम्ही लूकआऊट नोटीस जारी केली आहे की मनीष सिसोदिया उपलब्ध नाहीत. ही काय नौटंकी आहे मोदीजी? मी दिल्लीत बिनधास्त फिरतोय, सांगा कुठे येऊ? तुम्हाल मी काय सापडत नाहीए का?' असं ट्विट करत सिसोदिय यांनी मोदी सरकारला थेट आव्हान दिलं आहे.

अधिक वाचा: Manish Sisodia यांच्या घरावर CBI कडून १४ तास छापेमारी

सीबीआयने केला दीर्घ तपास 

शुक्रवारी, दारूच्या कंत्राटातील गैरव्यवहाराबद्दल, सीबीआयने अरविंद केजरीवाल यांचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी तब्बल 14 तास छापेमारी करत होती, काल आम आदमी पक्षाने त्या कराराचा नवा राजकीय अर्थ काढला. 'आप'ने दावा केला की भाजपची चिंता केवळ दारूच्या ठेक्यातील गैरप्रकारांबद्दल नाही तर त्यांची चिंता 2024 च्या सत्तेच्या कराराबद्दल आहे. ज्यामध्ये नरेंद्र मोदींसमोर अरविंद केजरीवाल हे सर्वात मोठे उमेदवार म्हणून समोर आले आहेत आणि त्यामुळेच ही छापेमारी सुरु आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी