Tamil Nadu Bus Accident : तमिळनाडूत दोन बसेसचा भीषण अपघात, ३० जण जखमी, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

लोकल ते ग्लोबल
Updated May 18, 2022 | 18:02 IST

तमिळनाडूच्या सालेम जिल्ह्यात दोन बसेसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३० प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे,

थोडं पण कामाचं
  • तमिळनाडूच्या सालेम जिल्ह्यात दोन बसेसचा भीषण अपघात झाला आहे.
  • या अपघातात ३० प्रवासी जखमी झाले आहेत.
  • दरम्यान ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे,

Tamil Nadu Bus Accident : चेन्नई : तमिळनाडूच्या (TTamil Nadu) सालेम जिल्ह्यात (salem district) दोन बसेसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३० प्रवासी जखमी झाले (30 commuter injured) आहेत. दरम्यान ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात (cctv camera) कैद झाली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल (video viral) होत आहे. (tamil nadu bus accident 30 commuter injured cctv footage viral)

तमिळनाडूच्या सालेम जिल्ह्यात दोन बस समोरासमोर आल्या आणि त्यांचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की त्यात ३० प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. दरम्यान ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यात स्पष्ट दिसत आहे की एक बस लेन सोडून विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये घुसली आणि या बसला धडकली. बस धडकली तेव्हा गाडीचा काचा फुटल्या आणि ड्रायव्हरही जागेवरून दुसरीकडे फेकला गेला. या अपघातात जखमी झालेल्या सर्व जखमींना सालेम आणि एडापट्टीच्या सरकारी आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी